पोलाद मंत्रालय
केंद्रीय पोलाद मंत्र्यांनी सार्वजनिक उपक्रमामध्ये उत्पादन खर्च कमी करण्याबाबतच्या परिस्थितीचा घेतला आढावा, मानक सुधारणेद्वारे उत्पादन खर्च कमी करण्याचे दिले निर्देश
Posted On:
21 SEP 2021 9:38AM by PIB Mumbai
पोलाद क्षेत्रातल्या सार्वजनिक उपक्रमामधला उत्पादन खर्च कमी करण्याबाबतच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय पोलाद मंत्री राम चंद्र प्रसाद सिंग यांच्या अध्यक्षतेखाली या उपक्रमांच्या अधिकाऱ्यांसमवेत काल बैठक घेण्यात आली. भविष्यासाठी कृती आराखडा तयार करण्याबाबतही यावेळी चर्चा झाली.

उत्पादन खर्चावर प्रभाव टाकणाऱ्या मानकांचे सूक्ष्म आणि व्यापक विश्लेषण करण्याच्या गरजेवर त्यांनी भर दिला. प्रतिकूल परिस्थितीचे संधीत रुपांतर करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले. मानकांमध्ये सुधारणा घडवत खर्च कपातीसाठीचा पथदर्शी आराखडा येत्या सहा महिन्यात तयार करून त्यासंदर्भात आवश्यक ती पावले उचलण्याचे निर्देश त्यांनी दिले.
कोकिंग कोळसा हा प्रामुख्याने आयात केला जात असून उत्पादन खर्चामधला हा सर्वात महत्वाचा घटक असल्याची माहिती त्यांना देण्यात आली. खर्चात कपात करण्याच्या महत्वाच्या उपाय योजनांवर लक्ष केंद्रित करत उत्पादन खर्च कमी करण्याचे आवाहन मंत्र्यांनी यावेळी केले.
बी एफ उत्पादकता, बीएफ कोक दर, कामगार उत्पादकता, पाण्याचा वापर यासारख्या, क्षमता आणि उत्पादकता यावर परिणाम करणाऱ्या घटकांचा यावेळी आढावा घेण्यात आला, ज्यामुळे उत्पादन खर्च कमी करण्याबरोबर उर्जा कार्यक्षमता वृद्धींगत करता येईल तसेच जीएचजी उत्सर्जन कमी आणि पाण्याचा वापर किमान राखता येईल.

***
STupe/NC/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1756667)
Visitor Counter : 135