आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारतातील एकूण कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण 81.85 कोटीहून अधिक


भारतात रुग्ण बरे होण्याचा सध्याचा दर 97.75%

गेल्या 24 तासात कोरोनाच्या 26,115 नव्या दैनंदिन रुग्णांची नोंद

देशातली सध्या उपचाराधीन रुग्णसंख्या (3,09,575) , असून ती एकूण रुग्णांच्या 0.92 %

साप्ताहिक पॉझीटीव्हिटी दर (2.08%) गेले 88 दिवस 3% पेक्षा कमी

Posted On: 21 SEP 2021 9:53AM by PIB Mumbai

भारतात गेल्या 24 तासात 96,46,778 मात्रा, देण्यात आल्या असून आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार भारतात कोविड-19 प्रतिबंधक लसींच्या आतापर्यंत एकूण 81.85 कोटींपेक्षा अधिक मात्रा (81,85,13,827) देण्यात आल्या आहेत. एकूण 80,35,135 सत्रांद्वारे या मात्रा देण्यात आल्या आहेत.

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या, वयोगटानिहाय एकूण लसीकरणाच्या आकडेवारीत पुढीलप्रमाणे लसींच्या मात्रांचा समावेश आहे-

HCWs

1st Dose

1,03,69,386

2nd Dose

87,50,107

 

FLWs

1st Dose

1,83,46,016

2nd Dose

1,45,66,593

 

Age Group 18-44 years

1st Dose

33,12,97,757

2nd Dose

6,26,66,347

 

Age Group 45-59 years

1st Dose

15,20,67,152

2nd Dose

7,00,70,609

 

Over 60 years

1st Dose

9,74,87,849

2nd Dose

5,28,92,011

Total

81,85,13,827

 

 

गेल्या 24 तासात 34,469 रुग्ण कोविडमुक्त झाले असून (महामारीच्या सुरवातीपासून) यामुळे कोरोनाची लागण झालेल्यांपैकी एकूण 3,27,49,574

रुग्ण कोविडमुक्त झाले आहेत.  

त्यामुळे बरे होण्याचा दर आता 97.75%.झाला आहे.

केंद्र आणि राज्य सरकार/ केंद्रशासित प्रदेश यांच्या समन्वित प्रयत्नांचा परिणाम म्हणून सलग 86 दिवसांपासून 50,000 पेक्षा कमी नव्या दैनंदिन रुग्णांची नोंद आता होत आहे.

गेल्या 24 तासात 26,115 नव्या रुग्णांची नोंद झाली

देशात उपचाराधीन रुग्णांची संख्या 3,09,575 आहे.उपचाराधीन रुग्ण, आतापर्यंतच्या एकूण पॉझिटीव्ह रुग्णांच्या 0.92% आहेत.

देशभरात चाचण्या करण्याच्या क्षमतेत वाढ सुरु आहे. देशात गेल्या 24 तासात एकूण 14,13,951 चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत 55.50 कोटींहून अधिक (55,50,35,717) चाचण्या केल्या आहेत.

देशभरात चाचण्यांच्या क्षमतेत वाढ होत असताना साप्ताहिक पॉझीटीव्हिटी दर सध्या 2.08% असून गेले 88 दिवस 3% पेक्षा कमी आहे. दैनंदिन पॉझीटीव्हिटी दर 1.85% इतका आहे.दैनंदिन पॉझीटीव्हिटी दर गेले 22 दिवस 3% पेक्षा कमी आणि 105 दिवस 5% पेक्षा कमी आहे.

***

JaideviPS/SampadaP/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com

 


(Release ID: 1756662) Visitor Counter : 226