संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

भारत आणि नेपाळ दरम्यान 15 व्या सूर्य किरण संयुक्त लष्करी प्रशिक्षण सरावाला पिथौरागढ (उत्तराखंड) येथे प्रारंभ

Posted On: 20 SEP 2021 7:10PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 20 सप्‍टेंबर 2021 

 

भारत आणि नेपाळच्या लष्करादरम्यान 15 व्या सूर्य किरण संयुक्त प्रशिक्षण सरावाला आज  पिथोरागढ (उत्तराखंड ) येथे प्रारंभ झाला. हा सराव 3 ऑक्टोबर पर्यंत चालेल. या सरावादरम्यान, भारतीय लष्कर  आणि नेपाळी लष्कराची प्रत्येकी एक इन्फट्री बटालियन सहभागी होत आहे. या सरावात दहशतवाद विरोधी मोहीम आणि आपत्कालीन बचाव कार्य याबाबत संयुक्त कारवाई करण्याबाबत सराव केला जाईल.

आज पारंपारिक उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला होता ज्यामध्ये दोन्ही तुकड्यानी  भारतीय आणि नेपाळी लष्करी धून वर संचलन केले. लेफ्टनंट जनरल एसएस महाल, जीओसी उत्तर भारत क्षेत्र यांनी  उपस्थितांना संबोधित केले आणि परस्पर विश्वास, आंतर - कार्यक्षमता मजबूत करण्यासाठी प्रशिक्षण घेण्याचे आणि सर्वोत्तम पद्धती सामायिक करण्याचे आवाहन केले. याआधी शनिवारी नेपाळी सैन्याची तुकडी पिथौरागढ येथे दाखल झाली आणि तिचे पारंपारिक लष्करी इतमामात स्वागत करण्यात आले. दोन्ही सैन्यातील सुमारे 650 जवान या सरावात सहभागी होत आहेत. 

* * *

M.Iyengar/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1756501) Visitor Counter : 390