वस्त्रोद्योग मंत्रालय

जीईएम पोर्टलवर 28,300 हून अधिक कारागीर आणि 1,49,422 विणकरांनी नोंदणी केली


सुमारे 35.22 लाख हातमाग कामगार आणि 27 लाख हस्तकला कारागीराना बाजारपेठेत थेट प्रवेशाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी उपक्रम

Posted On: 20 SEP 2021 5:57PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 20 सप्‍टेंबर 2021 

 

विणकर आणि कारागिरांना बाजारपेठेत वाढीव प्रवेश उपलब्ध करून देण्यासाठी जीईएम पोर्टलवर विणकर आणि कारागीरांना सामावून घेण्याची  मोहीम सुरू करण्यात आली आहे जेणेकरून त्यांना त्यांची उत्पादने थेट सरकारी विभागांना विकता येतील. यामुळे कारागीर, विणकर, छोटे उद्योजक, महिला, आदिवासी उद्योजक आणि हातमाग आणि हस्तकला क्षेत्रात काम करणार्‍या बचतगटांसारख्या छोट्या विक्रेता गटांचा सहभाग वाढेल, ज्यांना सरकारी बाजारपेठांमध्ये प्रवेश मिळवतना विविध आव्हानांचा सामना करावा लागतो.

30 ऑगस्ट, 2021 पर्यंत, पोर्टलवर 28,374 कारागीर आणि 1,49,422 विणकरांची नोंदणी झाली आहे. जीईएमने जुलै 2020 मध्ये हातमाग विकास आयुक्त आणि हस्तकला विकास आयुक्त कार्यालयाच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने विक्रेता नोंदणी आणि विणकर आणि कारागीरांचे ऑनबोर्डिंग सुरू केले होते. 56 हस्तकला सेवा केंद्र आणि 28 विणकर सेवा केंद्रांच्या अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आणि  विक्रेता नोंदणी प्रक्रियेत सहभागी करण्यात आले.

उच्च दर्जाची हस्तकला आणि हातमाग उत्पादने प्रदर्शित करण्यासाठी भारतीय हातमाग (https://gem.gov.in/landing/landing/india_handloom) आणि भारतीय हस्तकला (https://gem.gov.in/india-handicraft) उत्पादनांसाठी समर्पित वेब-बॅनर्स  आणि  मार्केट पेजेस  विकसित करण्यात आली आहेत.

हा उपक्रम अंदाजे 35.22 लाख हातमाग कामगार आणि 27 लाख हस्तकला कारागीराना  बाजारपेठेत थेट प्रवेश संधी उपलब्ध करून देण्याच्या आणि दलालांना दूर ठेवण्याच्या उद्देशाने सुरु केला आहे.  जीईएमने हातमाग आणि हस्तकला उत्पादनांसाठी खास  उत्पादन श्रेणी तयार केल्या आहेत.

 

* * *

M.Chopade/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1756459) Visitor Counter : 200