ग्रामीण विकास मंत्रालय

दीनदयाल अंत्योदय योजना-राष्ट्रीय ग्रामीण आजीविका मिशन चौथा राष्ट्रीय पोषण माह, 2021 साजरा करत आहे

Posted On: 18 SEP 2021 11:35AM by PIB Mumbai

 

पोषण माह अंतर्गत, ग्रामीण विकास मंत्रालयाद्वारे दीनदयाल अंत्योदय योजना-राष्ट्रीय ग्रामीण आजीविका मिशनने (DAY-NRLM) 6 वर्तन बदलाला प्रोत्साहन देण्यासाठी निवडलेल्या ठिकाणी अन्न, पोषण, आरोग्य आणि स्वच्छता (FNHW) या संबंधित उपक्रमांची अंमलबजावणी सुरू केली आहे.  बचत गटातील सदस्य आणि त्यांच्या कुटुंबांकरता शिफारस केलेल्या पद्धतींचा अवलंब करत हे उपक्रम राबवले जात आहेत.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image001VMRQ.jpg

पोषण अभियान अंतर्गत महिला आणि बाल विकास मंत्रालयाशीही ग्रामविकास मंत्रालयाने भागीदारी केली आहे.

समग्र पोषण अभियानासाठी पंतप्रधानांच्या व्यापक योजनेअंतर्गत, दरवर्षी, सप्टेंबर महिना राष्ट्रीय पोषण माह म्हणून साजरा केला जातो. किशोरवयीन, गर्भवती, स्तनदा माता आणि मुलांमधील कुपोषण दूर करण्यासाठी अभिसरण आणि वर्तन बदलण्याच्या प्रयत्नांना बळकटी मिळावी हा या मागचा उद्देश आहे.

 

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image0022W6D.jpg https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image003IZYW.jpg

या वर्षीच्या राष्ट्रीय पोषण माह साठी, चार संकल्पनांवर काम केले जाणार आहे. प्रत्येक आठवड्यासाठी एक संकल्पना राबवली जाईल.  (i) 'पोषण वाटिका' या अंतर्गत वृक्षारोपण केले जाईल, (ii) पौष्टिकतेसाठी योग आणि आयुष, (iii) कुपोषणाचे प्रमाण अधिक असलेल्या जिल्ह्यातील अंगणवाडी लाभार्थ्यांना 'प्रादेशिक पोषण किट' वितरण आणि (iv) अतिकुपोषणग्रस्त बालकांचा शोध  आणि पौष्टिक आहाराचे वितरण.  या संकल्पनांसह, मंत्रालयाने राज्य ग्रामीण आजीविका मिशन (एसआरएलएम) ला विविध उपाययोजना करण्याचा सल्ला दिला आहे. यानुसार आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर कोविड-19 प्रतिबंधक योग्य वर्तनाची खबरदारी घ्यावी, बचतगट सदस्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना कोविड -19 लसीकरणासाठी प्रोत्साहन द्यावे, आरोग्याची काळजी घेणाऱ्या आणि प्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या वर्तनाला प्रोत्साहन द्यावे.  शेवग्याच्या वृक्ष लागवडीवर लक्ष केंद्रित करून उपाययोजना तयार करणे, आहारात वैविध्यता आणि बाजरीसह पारंपारिक खाद्यपदार्थांना प्रोत्साहन देणे या संदर्भात एमओआरडीकडून एसआरएलएमला सल्ला देण्यात आला आहे.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image004P4XX.jpg

पंतप्रधानांनी गेल्या महिन्यात बचत गट सदस्यांशी संवाद साधला आणि त्यांना स्वातंत्र्याचा 75 वा वर्धापनदिन साजरा करण्यासाठी  आरोग्य, पोषण आणि स्वच्छता यासह सामाजिक विकासाच्या मुद्द्यांवर जागरूकता निर्माण करण्यासाठी 75 तास त्यावर काम करण्याचा सल्ला दिला.  त्यानुसार नियोजन करा आणि चालू पोषण माह दरम्यान जनजागृती उपक्रम घेण्यासाठी बचतगट सदस्यांना मदत करा असे एसआरएलएमना सूचित केले आहे. राज्य ग्रामीण आजीविका मिशनने, पोषण माह साजरा करण्यास सुरुवात केली आहे. पोषण फेरी, पोषण प्रतिज्ञा, पोषण रांगोळ्या, योग सत्र, संवादी बैठका, पोषण-उद्यान प्रोत्साहन इ. सारख्या विविध उपक्रमांचा यात समावेश आहे.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image005345H.jpg https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image006PEMA.jpg

 

***

S.Tupe/V.GhodeP.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai@gmail.com(Release ID: 1756085) Visitor Counter : 109