संरक्षण मंत्रालय

राष्ट्रीय छात्र सेनेचा व्यापक आढावा घेण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने नेमली उच्च स्तरीय तज्ञ समिती

Posted On: 16 SEP 2021 5:53PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 16 सप्टेंबर 2021

प्रमुख वैशिष्ट्ये :

  • राष्ट्र उभारणीमध्ये एनसीसी अर्थात राष्ट्रीय  छात्र सेनेच्या  छात्रांना   अधिक प्रभावी योगदानासाठी सक्षम करण्याकरिता समिती उपाय सुचवणार
  • छात्र सेनेच्या अधिक हितासाठी, एनसीसीच्या माजी विद्यार्थ्यांकडून हातभार लावण्यासाठी, समिती मार्ग  सुचवणार
  • एनसीसीच्या अभ्यासक्रमात समावेश करण्याच्या दृष्टीने  अशाच प्रकारच्या आंतरराष्ट्रीय युवा संस्थेतल्या उत्तम पद्धतींची शिफारस करणार
  • माजी खासदार बैजयंत पांडा या समितीचे अध्यक्ष तर क्रिकेटपटू एम एस धोनी, महिंद्र समुहाचे अध्यक्ष आनंद महिंद्र यांचा सदस्यात समावेश

राष्ट्रीय छात्र सेनेचा व्यापक आढावा घेत बदलत्या काळानुरूप एनसीसी अधिक समर्पक करण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने माजी खासदार बैजयंत पांडा यांच्या अध्यक्षतेखाली उच्च स्तरीय तज्ञ समिती स्थापन केली आहे.

राष्ट्र उभारणीमध्ये आणि विविध क्षेत्रात राष्ट्र उभारणीच्या प्रयत्नात एनसीसी छात्रांना अधिक प्रभावी योगदानासाठी सक्षम करण्याकरिता, एनसीसीच्या माजी विद्यार्थ्यांकडून हातभार लावण्यासाठी तसेच  एनसीसीचा अभ्यासक्रमात समावेश करण्याच्या दृष्टीने  अशाच प्रकारच्या आंतरराष्ट्रीय युवा संस्थेतल्या उत्तम पद्धतींची शिफारस समिती करणार आहे.

समितीचे सदस्य याप्रमाणे आहेत-

 

Shri Baijayant Panda, former Member of Parliament

Chairperson

 

Col. (Retd) Rajyavardhan Singh Rathore, Member of Parliament

Member

 

Shri Vinay Sahasrabuddhe, Member of Parliament

Member

 

Shri Anand Mahindra, Chairman, Mahindra Group

Member

 

Shri Mahendra Singh Dhoni, Cricketer

Member

 

Shri Sanjeev Sanyal, Principal Economic Advisor, Ministry of Finance

Member

 

Prof. Najma Akhtar, Vice Chancellor, Jamia Millia Islamia

Member

 

Prof. Vasudha Kamat, Former VC, SNDT Women’s University

Member

 

Shri Mukul Kanitkar, National Organizing Secretary, Bhartiya Shikshan Mandal

Member

 

Maj. Gen. Alok Raj (Retd)

Member

 

Shri Milind Kamble, Chairman, DICCI

Member

 

Shri Rituraj Sinha, MD, SIS India Limited

Member

 

Ms. Vedika Bhandarkar, Chief Operating Officer, Water.org

Member

 

Shri Anand Shah, CEO, Databook

Member

 

Shri Mayank Tewari, JS (Trg), DoD

Member Secretary

एनसीसी ही युवकांमध्ये शिस्त,धर्मनिरपेक्ष दृष्टीकोन, निःस्वार्थ सेवा बाणवत त्यांचे चरित्र घडवणारी गणवेशधारी मोठी संस्था आहे. समाजातल्या सर्व क्षेत्रात नेतृत्व करण्याचे गुण असलेले, संघटीत, प्रशिक्षित आणि ध्येय्याने प्रेरित युवक संघटीत करण्याचा याचा उद्देश आहे.

 

M.Iyengar/N.Chitale/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1755507) Visitor Counter : 265