PIB Headquarters

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित बातमीपत्र

Posted On: 15 SEP 2021 5:35PM by PIB Mumbai

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image0020FX3.png https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image001BPSF.jpg

  • 75.89 Cr. vaccine doses have been administered so far under Nationwide Vaccination Drive
  • Daily new cases less than 30,000 for last 4 days; 27,176 new cases in the last 24 hours
  • Active cases account for 1.05% of total cases
  • India's Active caseload stands at 3,51,087
  • Recovery Rate currently at 97.62%
  • 38,012 recoveries in the last 24 hours increases Total Recoveries to 3,25,22,171
  • Weekly Positivity Rate (2.00%) less than 3% for last 82 days
  • Daily positivity rate (1.69%) less than 3% for last 16 days
  • 54.60 crore Total Tests conducted so far

#Unite2FightCorona

#IndiaFightsCorona

Image

Image

Image

नवी दिल्‍ली/मुंबई, 15 सप्‍टेंबर 2021

 

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19 घडामोडींवरील माहिती

भारताने गेल्या 24 तासात 61,15,690 मात्रा, पात्र नागरिकांना दिल्या असून आज सकाळी 7  वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार भारताने आतापर्यंत एकूण  75.89 कोटीपेक्षा जास्त मात्रा (75,89,12,277) दिल्या आहेत. एकूण 76,68,216 सत्रांद्वारे  मात्रा देण्यात आल्या  आहेत. देशभरात कोविड लसीकरणाचा वेग आणि व्याप्ती वाढवण्यासाठी केंद्र सरकार कटीबद्ध आहे.

गेल्या 24 तासात 38,012 रुग्ण कोरोना मुक्त झाले असून महामारीच्या सुरवातीपासून कोरोनाची लागण झालेल्यांपैकी एकूण 3,25,22,171 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. कोरोनातून बरे होण्याचा दर  97.62%.झाला आहे. देशात उपचाराधीन रुग्णांची संख्या 3,51,087 आहे.उपचाराधीन रुग्ण, आतापर्यंतच्या एकूण पॉझिटीव्ह रुग्णांच्या 1.05% आहेत.

सलग 80  दिवसांपासून  50,000 पेक्षा कमी नव्या दैनंदिन रुग्णांची नोंद होत असून केंद्र आणि राज्य सरकार/ केंद्र शासित प्रदेश यांच्या समन्वित प्रयत्नांचा हा परिणाम आहे. गेल्या 24 तासात 27,176 नव्या रुग्णांची नोंद झाली.

चाचण्या  करण्याच्या क्षमतेत वाढ सुरु असून देशात गेल्या 24 तासात 16,10,829 चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत 54.60 कोटीहून अधिक  (54,60,55,796) चाचण्या केल्या आहेत. देशभरात चाचण्यांच्या क्षमतेत वाढ होत असताना साप्ताहिक पॉझीटीव्हिटी दर सध्या 2.00% असून गेले 82 दिवस 3% पेक्षा कमी आहे. दैनंदिन पॉझीटीव्हिटी दर 1.69% असून गेले 16 दिवस 3% पेक्षा कमी आणि 99 दिवस  5% पेक्षा कमी आहे.

 

इतर अपडेट्स :

 

महत्त्‍वाचे ट्विट्स

 

 

 

 

 

 

* * *

M.Chopade/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1755108) Visitor Counter : 105