आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

भारतात कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण 75.89 कोटीहून अधिक भारतात रुग्ण बरे होण्याचा सध्याचा दर 97.62%


देशात गेल्या 24 तासात कोरोनाचे 27,176 नवे दैनंदिन रुग्ण

देशातली सध्या उपचाराधीन रुग्णसंख्या (3,51,087) ही आतापर्यंतच्या एकूण रुग्णांच्या 1.05%

साप्ताहिक पॉझीटीव्हिटी दर (2.00%) गेले 82 दिवस 3% कमी

Posted On: 15 SEP 2021 9:25AM by PIB Mumbai

भारताने गेल्या 24 तासात 61,15,690 मात्रा, पात्र नागरिकांना दिल्या असून आज सकाळी 7  वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार भारताने आतापर्यंत एकूण  75.89 कोटीपेक्षा जास्त मात्रा (75,89,12,277) दिल्या आहेत. एकूण 76,68,216 सत्रांद्वारे  मात्रा देण्यात आल्या  आहेत.

यामध्ये यांचा समावेश आहे-

 

 

HCWs

1st Dose

1,03,65,064

2nd Dose

86,27,893

 

FLWs

1st Dose

1,83,39,480

2nd Dose

1,41,57,234

 

Age Group 18-44 years

1st Dose

30,62,20,932

2nd Dose

4,70,46,927

 

Age Group 45-59 years

1st Dose

14,55,58,893

2nd Dose

6,43,69,047

 

Over 60 years

1st Dose

9,41,72,886

2nd Dose

5,00,53,921

Total

75,89,12,277

देशभरात कोविड लसीकरणाचा वेग आणि व्याप्ती वाढवण्यासाठी केंद्र सरकार कटीबद्ध आहे.

गेल्या 24 तासात 38,012 रुग्ण कोरोना मुक्त झाले असून महामारीच्या सुरवातीपासून कोरोनाची लागण झालेल्यांपैकी एकूण 3,25,22,171

रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत.  

कोरोनातून बरे होण्याचा दर  97.62%.झाला आहे.

सलग  80  दिवसांपासून  50,000 पेक्षा कमी नव्या दैनंदिन रुग्णांची नोंद होत असून केंद्र आणि राज्य सरकार/ केंद्र शासित प्रदेश यांच्या समन्वित प्रयत्नांचा हा परिणाम आहे.

गेल्या 24 तासात 27,176 नव्या रुग्णांची नोंद झाली.

देशात उपचाराधीन रुग्णांची संख्या 3,51,087 आहे.उपचाराधीन रुग्ण, आतापर्यंतच्या एकूण पॉझिटीव्ह रुग्णांच्या 1.05% आहेत.

चाचण्या  करण्याच्या क्षमतेत वाढ सुरु असून देशात गेल्या 24 तासात 16,10,829 चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत 54.60 कोटीहून अधिक  (54,60,55,796) चाचण्या केल्या आहेत.

देशभरात चाचण्यांच्या क्षमतेत वाढ होत असताना साप्ताहिक पॉझीटीव्हिटी दर सध्या 2.00% असून गेले 82 दिवस 3% पेक्षा कमी आहे. दैनंदिन पॉझीटीव्हिटी दर 1.69% असून गेले 16 दिवस 3% पेक्षा कमी आणि 99 दिवस  5% पेक्षा कमी आहे.

***

 

Jaydevi PS/NC/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1754983) Visitor Counter : 196