अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

मूल्यांकन वर्ष 2021-22 साठी प्राप्तिकर विवरणपत्रे भरण्याची आणि लेखापरीक्षणाचे विविध अहवाल सादर करण्याची मुदत केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने वाढवली

Posted On: 09 SEP 2021 8:24PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 9 सप्टेंबर 2021

प्राप्तिकर  अधिनियम, 1961 ("कायदा") अंतर्गत मूल्यांकन वर्ष 2021-22 साठी प्राप्तिकर विवरणपत्र भरताना आणि लेखापरीक्षणाचे  विविध अहवाल दाखल करताना करदात्यांनी आणि इतर संबंधितांनी  नोंदवलेल्या अडचणी लक्षात घेऊन ,केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) मुल्यांकन वर्ष 2021-22  साठी प्राप्तिकर विवरणपत्रे आणि  लेखापरीक्षणाचे  विविध अहवाल सादर करण्याची  मुदत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

सीबीडीटी परिपत्रक क्र. 17/2021 F.No.225/49/2021/ITA-II दिनांक 09.09.2021 रोजी जारी करण्यात आले आहे. हे परिपत्रक www.incometaxindia.gov.in या संकेतस्थळावर  उपलब्ध आहे.

अधिक माहितीसाठी कृपया  येथे क्लिक करा

M.Chopade/S.Chavan/P.Malandkar

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1753643) Visitor Counter : 454