संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सशस्त्र दलांना महसूली तरतुदीनुसार खरेदीसाठी वित्तीय अधिकार देण्यास मंजुरी दिली


सुरक्षा विषयक पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी संरक्षण सुधारणांमध्ये हे सरकारचे आणखी एक मोठे पाऊल असल्याचे नमूद केले

Posted On: 07 SEP 2021 6:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 7 सप्टेंबर 2021

डीएफपीडीएस ( DFPDS)2021 ची ठळक वैशिष्ट्ये :

  • फील्ड फॉरमेशनकडे वित्तीय  अधिकार हस्तांतरित, कार्य सज्जतेवर लक्ष केंद्रित, व्यवसाय सुलभता आणि सेवांमध्ये एकजुटीला प्रोत्साहन
  • सक्षम वित्तीय अधिकाऱ्यांसाठी दोन पट सामान्य वाढ; विशिष्ट कार्यासाठी फील्ड फॉर्मेशनच्या वित्तीय अधिकारात 5-10 पटीने वाढ
  • सेनादल उपप्रमुखांच्या वित्तीय अधिकारांमध्ये 10% वाढ ;
  • 'आत्मनिर्भर  भारत' साध्य करण्यासाठी स्वदेशीकरण/संशोधन आणि विकास संबंधित कार्यक्रमात तीन पटीने वाढ
  • तात्काळ लष्करी कारवायांसाठी आपत्कालीन अधिकारांच्या वेळापत्रकात समाविष्ट संरक्षण सेवांसाठी कमांड स्तराखालील  फील्ड फॉरमेशनला आपत्कालीन वित्तीय अधिकारांची तरतूद

संरक्षण मंत्री  राजनाथ सिंह यांनी  7 सप्टेंबर, 2021 रोजी नवी दिल्लीत सशस्त्र दलांना वाढीव  खरेदी अधिकार  प्रदान करणारे संरक्षण सेनादल वित्तीय अधिकारांचे हस्तांतरण  (डीएफपीडीएस) 2021 संबंधी आदेश जारी केले. डीएफपीडीएस 2021 चा उद्देश फिल्ड फॉर्मेशनना  सशक्त बनवणे; कार्य सज्जतेवर  लक्ष केंद्रित करणे, व्यवसाय सुलभतेला प्रोत्साहन  आणि सरंक्षण सेवांमध्ये एकजूट वाढवणे हा आहे.

सेनादल मुख्यालय आणि निम्न स्थापनेतील पदाधिकाऱ्यांकडे वित्तीय अधिकारांचे वाढीव हस्तांतरणमुळे सर्व स्तरांवर जलद निर्णय घेणे शक्य होईल ज्यामुळे  उत्तम नियोजन आणि संचलन सज्जता वेगाने होऊन संसाधनांचा योग्य  वापर सुनिश्चित होईल.

वित्तीय अधिकारांच्या वाढीव हस्तांतरणाचा भर तात्काळ  आवश्यकतेसाठी आणि आवश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी फील्ड कमांडर्सना  उपकरणे/युद्ध सदृश सामुग्री  खरेदी करण्यासाठी सक्षम करण्यावर आहे. संरक्षण सेवांसाठी सर्व स्तरांवर अशी वाढ 2016 मध्ये करण्यात आली होती.

यावेळी बोलताना, संरक्षण मंत्री म्हणाले की डीएफपीडीएस  2021 हे देशाच्या सुरक्षा विषयक पायाभूत सुविधा बळकट करण्यासाठी सरकारकडून करण्यात येत असलेल्या संरक्षण सुधारणांच्या मालिकेतील आणखी एक मोठे पाऊल आहे.  सशस्त्र दलांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी धोरणांमध्ये सुधारणा करण्याच्या गरजेवर त्यांनी भर दिला,  डीएफपीडीएस 2021 केवळ प्रक्रियात्मक विलंब दूर करणार नाही तर अधिक विकेंद्रीकरण आणि   कार्यक्षमता आणेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. संरक्षण मंत्र्यांनी देशाची सुरक्षा व्यवस्था मजबूत आणि सर्वच बाबतीत  'आत्मनिर्भर ' बनवण्याच्या सरकारच्या संकल्पाचा पुनरुच्चार केला.

आपल्या प्रास्ताविकात वित्तीय सल्लागार (संरक्षण सेना) संजीव मित्तल यांनी विश्वास व्यक्त केला की डीएफपीडीएस 2021 तळागाळापर्यंत व्यवसाय सुलभतेला चालना देईल आणि वित्तीय अधिकारांच्या हस्तांतरणाद्वारे अधिक विकेंद्रीकरण सुलभ करेल.

डीएफपीडीएस 2021 मध्ये खालील वित्तीय अधिकारांशी संबंधित मार्गदर्शक तत्वे आहेत:

  • आर्मी शेड्युल्स ऑफ पॉवर्स -2021 (ASP-2021)
  • नेव्ही  शेड्युल्स ऑफ पॉवर्स -2021 (NSP-2021)
  • एअर फोर्स शेड्युल्स ऑफ पॉवर्स -2021 (AFSP- 2021)
  • आयडीएस शेड्युल्स ऑफ पॉवर्स -2021 (ISP-2021)

यावेळी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ  जनरल बिपीन रावत, नौदल प्रमुख ऍडमिरल  करमबीर सिंह, संरक्षण सचिव डॉ.अजय कुमार आणि संरक्षण मंत्रालयाचे वरिष्ठ नागरी आणि लष्करी अधिकारी उपस्थित होते.

 

M.Iyengar/S.Kane/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1752900) Visitor Counter : 264