उपराष्ट्रपती कार्यालय

कोविड -19 लसीकरण मोहीम ही लोक चळवळ व्हावी: उपराष्ट्रपती


लोकप्रतिनिधी, चित्रपट आणि क्रीडा क्षेत्रातील व्यक्तींनी लोकांना लसीकरण करण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन उपराष्ट्रपतींनी केले आहे

उपराष्ट्रपतींनी हैदराबाद, विजयवाडा आणि नेल्लोर येथे स्वर्ण भारत ट्रस्टच्या वतीने आयोजित केलेल्या मोफत लसीकरण मोहिमेचा शुभारंभ केला

Posted On: 07 SEP 2021 3:21PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 7 सप्टेंबर 2021

उपराष्ट्रपती, श्री एम व्यंकय्या नायडू म्हणाले, की लोकप्रतिनिधीकोविड -19 लसीकरण मोहीम ही लोक चळवळ व्हावी आणि त्यांनी आज असे आवाहन केले की प्रत्येक पात्र व्यक्तीने आवश्यक असतील तेवढ्या लसींच्या मात्रा जराही न घाबरता अथवा संकोचून न जाता घ्यायला हव्यात.

हैदराबादमध्ये, स्वर्ण भारत ट्रस्टने भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेड आणि मेडिसिटी हॉस्पिटलच्या सहकार्याने आयोजित केलेल्या मोफत लसीकरण कार्यक्रमाचा  आरंभ करताना श्री नायडू म्हणाले की, लस घेण्याशिवाय दुसरा पर्याय नाही.

लसींवरील चुकीच्या माहितीचा प्रतिरोध करण्याचे आवाहन करून त्यांनी लोकप्रतिनिधी, चित्रपट आणि क्रीडाक्षेत्रातील मान्यवर व्यक्तींनी  कोविड -19  लसीकरणावरील गैरसमज आणि भीती दूर करण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले.

या महामारीशी  प्रभावीपणे लढण्यासाठी लसीकरणानंतरही कोविड योग्य वर्तन महत्त्वाचे आहे, असेही उपराष्ट्रपतींनी यावेळी सांगितले. लोकांनी वैयक्तिक स्वच्छतेचे पालन करत, मास्क घालून आणि सुरक्षित अंतर राखून आपली वैयक्तिक जबाबदारी स्वीकारली पाहिजे यावर त्यांनी भर दिला.

स्वर्ण भारत ट्रस्ट, भारत बायोटेक, मुप्पावरपू फाउंडेशन, मेडिसिटी हॉस्पिटल (हैदराबाद), सिंहपुरी वैद्य सेवा समिती (नेल्लोर), पिन्नमनेनी सिद्धार्थ हॉस्पिटल (विजयवाडा) या आयोजकांची, मोफत लसीकरण कार्यक्रमासाठी पुढाकार घेतल्याबद्दल आणि  केलेल्या प्रयत्नांसाठी  उपराष्ट्रपतींनी प्रशंसा केली.

मोफत लसीकरण कार्यक्रम एकाच वेळी हैदराबाद, विजयवाडा आणि नेल्लोर या तीन केंद्रांवर सुरू करण्यात आला.

 

Jaydevi PS/S.Patgaonkar/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1752816) Visitor Counter : 210