PIB Headquarters
azadi ka amrit mahotsav

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित बातमीपत्र

Posted On: 02 SEP 2021 3:25PM by PIB Mumbai

नवी दिल्ली/मुंबई 2 सप्टेंबर 2021

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19  घडामोडींवरील माहिती

भारतात कोविड-19  प्रतिबंधक लसीकरणाने 66  कोटी मात्रांचा महत्वाचा टप्पा काल  पार केला. भारताने गेल्या 24 तासात 81,09,244 मात्रा, पात्र नागरिकांना दिल्या असून आज सकाळी 7  वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार भारताने आतापर्यंत एकूण  66.30 कोटीपेक्षा जास्त मात्रा (66,30,37,334) दिल्या आहेत. एकूण 69,60,983 सत्रांद्वारे  मात्रा देण्यात आल्या  आहेत.

देशभरात कोविड लसीकरणाचा वेग आणि व्याप्ती वाढवण्यासाठी केंद्र सरकार कटीबद्ध आहे.

गेल्या 24 तासात 35,181 रुग्ण कोरोना मुक्त झाले असून महामारीच्या सुरवातीपासून कोरोनाची लागण झालेल्यांपैकी एकूण 3,20,28,825 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. 

कोरोनातून बरे होण्याचा दर  97.48%.झाला आहे. सलग  67  दिवसांपासून  50,000 पेक्षा कमी नव्या दैनंदिन रुग्णांची नोंद होत असून केंद्र आणि राज्य सरकार/ केंद्र शासित प्रदेश यांच्या समन्वित प्रयत्नांचा हा परिणाम आहे.

गेल्या 24 तासात 47,092 नव्या रुग्णांची नोंद झाली. देशात उपचाराधीन रुग्णांची संख्या 3,89,583 आहे.उपचाराधीन रुग्ण, एकूण रुग्णांच्या 1.19% आहेत.

चाचण्या  करण्याच्या क्षमतेत वाढ सुरु असून देशात गेल्या 24 तासात 16,84,441 चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत 52.48 कोटीहून अधिक (52,48,68,734) चाचण्या केल्या आहेत.

देशभरात चाचण्यांच्या क्षमतेत वाढ होत असताना साप्ताहिक पॉझीटीव्हिटी दर सध्या 2.62% असून गेले 69 दिवस 3% पेक्षा कमी आहे. दैनंदिन पॉझीटीव्हिटी दर 2.80% असून हा दर गेले  87  दिवस  5% पेक्षा कमी आहे.

इतर अपडेट्‌स:-

 

Jaydevi PS/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1751389) Visitor Counter : 221