आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमधील कोविड -19 प्रतिबंधक लसींच्या मात्रांच्या उपलब्धतेबाबत अद्ययावत माहिती
राज्ये /केंद्रशासित प्रदेशांना आतापर्यंत लसीच्या 64.65 कोटींहून अधिक मात्रांचा पुरवठा करण्यात आला आहे
राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये अद्यापही न वापरलेल्या 4.78 कोटींहून अधिक लसीच्या मात्रा शिल्लक
Posted On:
02 SEP 2021 9:32AM by PIB Mumbai
देशभरात कोविड -19 प्रतिबंधक लसीकरणाचा वेग आणि व्याप्ती वाढविण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध आहे. कोविड -19 प्रतिबंधक लसीकरणाच्या सार्वत्रिकीकरणाच्या नवीन टप्प्याला 21 जून,2021 पासून सुरुवात झाली. राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना लसीकरणाचे उत्तम नियोजन करण्याच्या आणि लसींची पुरवठा साखळी सुनियोजित करण्याच्या दृष्टीने लसींची अधिक उपलब्धता, लसींच्या साठ्याविषयी आगाऊ सूचना या माध्यमातून लसीकरण मोहिमेची गती वाढविण्यात आली आहे.
देशव्यापी लसीकरण मोहिमेचा एक भाग म्हणून, केंद्र सरकार राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना कोविड प्रतिबंधक लसीचा पुरवठा विनामूल्य करत आहे. कोविड -19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेच्या सार्वत्रिकीकरणाच्या नवीन टप्प्यात,केंद्र सरकार देशातील लस उत्पादकांद्वारे उत्पादित 75% लस खरेदी करून या लसीचा राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना (विनामूल्य ) पुरवठा करत आहे.
VACCINE DOSES
|
(As on 2 September 2021)
|
SUPPLIED
|
64,65,07,160
|
BALANCE AVAILABLE
|
4,78,94,030
|
केंद्र सरकारद्वारे (विनामूल्य पुरवठा मार्गाने ) आणि थेट राज्यांकडून खरेदीच्या मार्गाने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना आतापर्यंत लसीच्या एकूण 64.65 कोटींहून अधिक (64,65,07,160) मात्रांचा पुरवठा केला आहे.
राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांकडे अद्यापही कोविड प्रतिबंधक लसीच्या न वापरलेल्या 4.78 कोटींहून अधिक (4,78,94,030) मात्रा अजूनही शिल्लक असून लसीकरणासाठी त्या उपलब्ध आहेत.
**********
Jaydevi PS/SP/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1751306)
Visitor Counter : 267