रेल्वे मंत्रालय

भारतीय रेल्वेच्या चंडीगढ रेल्वे स्थानकाला एफएसएसएआयचा पंचतारांकित ‘ईट राइट स्टेशन’ प्रमाणपत्र पुरस्कार


प्रवाशांना सुरक्षित आणि संपूर्ण पौष्टिक आहार देण्याचे सर्व निकष पूर्ण करणाऱ्या रेल्वे स्थानकांना एफएसएसएआयचे “ईट राइट स्टेशन’ प्रमाणपत्र दिले जाते

हे प्रमाणपत्र मिळवणारे चंडीगढ ठरले देशातले पाचवे रेल्वे स्थानक

Posted On: 02 SEP 2021 3:20PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 2 सप्टेंबर 2021

प्रवाशांना उत्तम दर्जाचा, पोषणयुक्त आहार पुरवल्याबद्दल, भारतीय रेल्वेच्या चंडीगढ रेल्वे स्थानकाला, भारतीय अन्न सुरक्षा आणि प्रमाणन प्राधिकरण-एफएसएसएआय तर्फे पंचतारांकित ‘ईट राइट स्टेशन’ हा प्रमाणपत्र पुरस्कार देण्यात आला आहे. प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या जेवणात, सकस आहारविषयक तसेच अन्नसुरक्षेबाबत स्वच्छतेच्या सर्व निकषांचे पालन करणाऱ्याअ  रेल्वे स्थानकांना हा दर्जा दिला जातो. एफएसएसएआयने नियुक्त केलेल्या बाह्य लेखापरीक्षण संस्थेने आपल्या तपासणीनंतर या स्थानकाला 1 ते 5 दरम्यान दिलेल्या रेटिंगच्या आधारावर चंडीगढ स्थानकाला हे प्रमाणपत्र देण्यात आले आहे. पंचतारांकित रेटिंगचा अर्थ, स्थानकाने आपल्या प्रवाशांना सुरक्षित आणि स्वच्छ अन्न पुरवण्यासाठी पुरेपूर काळजी घेतली आहे, असा होतो.

ईट राइट इंडिया’ चळवळीचे प्रमाणपत्र देतांना, एफएसएसएआयचा व्यापक उद्देश, देशातील सर्व नागरिकांना सुरक्षित, उत्तम दर्जाचा, पोषणयुक्त आहार मिळावा यासाठी देशातिल संपूर्ण आहारव्यवस्थेत आमूलाग्र बदल करणे हा आहे. आहारविषयक नियमन, क्षमता बांधणी, समन्वयीत प्रयत्न आणि आहार, नागरिक तसेच निसर्ग या दोन्हीसाठी योग्य आणि संतुलित असावा या सर्व तत्वांचा समतोल साधण्याचा प्रयत्न ईट राइट इंडिया’ चळवळीत केला जात आहे.

हे प्रमाणपत्र मिळवणारे चंडीगढ देशातले पाचवे रेल्वे स्थानक ठरले आहे.याआधी, आनंद विहार टर्मिनल रेल्वे  स्थानक (दिल्ली), छत्रपती शिवाजी टर्मिनस (मुंबई), मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानक (मुंबई), आणि वडोदरा रेल्वे स्थानकाला हे प्रमाणपत्र मिळाले आहे.

भारतीय रेल्वे स्थानक विकास महामंडळ मर्या. (IRSDC) कडे, पांच रेल्वे स्थानकांव, ज्यात- केएसआर बेंगळूरु, पुणे, आनंद विहार, चंडीगढ आणि सिकंदराबाद या ठिकाणी सुविधा व्यवस्थापन करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. जेणेकरुन प्रवाशांचा प्रवास सुरक्षित आणि आरामदायी होईल. प्रवाशांचा रेल्वेविषयीचा अनुभव बदलवण्यासाठी आणि विकास, पुनर्विकास, कार्यान्वयन आणि रेल्वेस्थानकांची देखभाल या सर्व बाबतीत, अद्ययावत आणि समाधानकारक सेवा पुरवण्यास IRSDC कटिबद्ध आहे. सुविधा व्यवस्थापनात IRSDC ने आतापर्यंत अनेक नवनवे विक्रम रचले आहेत, ज्यात, ‘वॉटर फ्रॉम एअर ही पाणी देण्याची मशीन, फिट इंडिया सकवाट कियोस्क, ईट राइट स्टेशन, डिजिटल लॉकर, जेनेरीक औषधी दुकान, मोबाईल चार्जिंग कियोस्क , रिटेल स्टोअर आणि फूड ट्रक अशा विविध सुविधांचा उल्लेख करता येईल.

लवकरच, देशातील आणखी 90 स्थानकात सुविधा व्यवस्थापनाची अंमलबजावणी टप्प्याटप्याने करण्याचे काम  IRSDC हाती घेणार आहे.  

 

Jaydevi PS/R.Aghor/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1751387) Visitor Counter : 234