अर्थ मंत्रालय
सिबीडीटीने विवाद से विश्वास कायद्याच्या कलम 3 अंतर्गत तारखेत केली वाढ
Posted On:
29 AUG 2021 6:14PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 29 ऑगस्ट 2021
प्रत्यक्ष कर विवाद से विश्वास कायद्याच्या अधिनियम 2020 (यापुढे “विवाद से विश्वास कायदा” म्हणून संबोधला जाईल) च्या अंतर्गत घोषणा करणाऱ्याने देय असलेली रक्कम विवाद से विश्वास कायद्याच्या कलम 3 अंतर्गत तक्त्यात नमूद केली आहे.
अलिकडेच 25 जून 2021 रोजी जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार, देय रकम भरण्याची अखेरची तारीख (कोणत्याही अतिरिक्त रक्कमेशिवाय) 31 ऑगस्ट 2021 अशी अधिसूचित करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त विवाद से विश्वास अधिनियमच्या अंतर्गत रक्कम (अतिरिक्त रकमेसह) भरण्याची अंतिम तारीख 31 ऑक्टोबर 2021 अशी अधिसूचित करण्यात आली आहे.
फॉर्म क्रमांक 3 जारी करताना आणि त्यात सुधारणा करताना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन, विवाद से विश्वास कायद्यांतर्गत घोषणा करणाऱ्याने पैसे भरण्याची पूर्व अट ठेवण्यात आली आहे, ती रक्कम भरण्याची शेवटची तारीख (कोणत्याही अतिरिक्त रकमेशिवाय) वाढवून 30 सप्टेंबर 2021 करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी आवश्यक अधिसूचना लवकरच जारी केली जाईल.
तथापि, हे स्पष्ट करण्यात आले आहे की विवाद से विश्वास अधिनियमांतर्गत (अतिरिक्त रकमेसह) रक्कम भरण्याची अंतिम तारीख बदलण्याचा कोणताही प्रस्ताव नाही. त्यामुळे ती 31 ऑक्टोबर 2021 अशीच असेल.
S.Thakur/S.Shaikh/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1750209)
Visitor Counter : 351