अर्थ मंत्रालय

भारतात 15,000 कोटी रुपयांची थेट परदेशी गुंतवणूक करण्यासाठीचा मेसर्स अन्कोरेज इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट होल्डिंग मर्या. या कंपनीच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजूरी


ही गुंतवणूक पायाभूत सुविधा आणि बांधकाम क्षेत्र तसेच विमानतळ क्षेत्राला चालना देणारी ठरेल

मालमत्तांच्या हाताळणीशी संबंधित अशा सरकारी मालकीच्या सुविधांची मालमत्ता भाड्याने देऊन निधी उपलब्ध झाल्यामुळे, ही गुंतवणूक, नुकत्याच जाहीर झालेल्या राष्ट्रीय चलनीकरण पाईपलाइनला महत्त्वाची चालना देणारी ठरेल

Posted On: 25 AUG 2021 6:20PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 25 ऑगस्‍ट 2021

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीने भारतात 15,000 कोटी रुपयांची थेट परदेशी गुंतवणूक करण्यासाठीचा मेसर्स अन्कोरेज इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट होल्डिंग मर्या. या कंपनीचा प्रस्ताव मंजूर केला आहे, या कंपनीने भारतात विशेष पायाभूत सुविधा आणि बांधकाम-विकास क्षेत्रांतील गुंतवणुकीकरिता प्रस्ताव दिला आहे.  यात विमानतळ क्षेत्र आणि हवाई उड्डाण संबंधी व्यापार आणि सेवा यांच्यातील प्रवाहित गुंतवणुकीसोबत वाहतूक क्षेत्र आणि लॉजिस्टिक व्यवस्थेचाही  समावेश असू शकेल.

या गुंतवणुकीत, बंगळूरू आंतरराष्ट्रीय विमानतळ मर्या.या कंपनीमधील काही हिस्सा मेसर्स अन्कोरेज कडे हस्तांतरित करणे तसेच 2726247 ओन्तरिओ आयएनसी या कॅनडातील सर्वात मोठ्या निश्चित निवृत्तीवेतन योजना ओमर्सची प्रशासक असलेल्या ओएसी च्या संपूर्ण मालकीच्या उपकंपनीद्वारे  मेसर्स अन्कोरेज इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट होल्डिंग मर्या. या कंपनीमध्ये होणाऱ्या 950 कोटी रुपयांच्या गुंतवणूकीचाही समावेश आहे. 

ही गुंतवणूक म्हणजे पायाभूत सुविधा आणि बांधकाम क्षेत्रासाठी तसेच विमानतळ क्षेत्रांना मोठी चालना देणारी ठरेल. खासगी भागीदारीतून जागतिक दर्जाचे विमानतळ आणि वाहतूकीसंबंधी पायाभूत सुविधा उभारण्याच्या भारत सरकारच्या योजनेला, या गुंतवणुकीमुळे लक्षणीय चालना मिळेल. ज्यामध्ये रस्ते,रेल्वे,विमानतळ,क्रीडा स्टेडीयम, वीज पारेषण वाहिन्या आणि गॅस वाहिन्या अशा  मालमत्तांच्या हाताळणीचा समावेश आहे अशा राज्य सरकारी मालकीच्या सुविधांच्या मालमत्ता भाड्याने देऊन निधी उपलब्ध झाल्यामुळे, नुकत्याच जाहीर झालेल्या एनएमपी अर्थात राष्ट्रीय चलनीकरण पाईपलाइनसाठी ही गुंतवणूक महत्त्वाची चालना ठरेल. मेसर्स अन्कोरेज इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट होल्डिंग मर्या.ही कंपनी एनएमपीच्या अंतर्गत येणाऱ्या काही क्षेत्रांमध्ये प्रवाहित गुंतवणूक  करण्याचा प्रस्ताव देत आहे.

मेसर्स अन्कोरेज इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट होल्डिंग मर्या.ही कंपनी ज्या क्षेत्रांमध्ये प्रवाहित गुंतवणूक करणार आहे ती निधी आणि रोजगार केंद्रित क्षेत्रे असल्यामुळे  या गुंतवणुकीतून थेट रोजगार संधी देखील निर्माण होतील. ही गुंतवणूक बांधकाम आणि सहाय्यक उपक्रमांदरम्यान अप्रत्यक्ष रोजगार देखील निर्माण करेल.

 

* * *

R.Aghor/S.Chitnis/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1748960) Visitor Counter : 181