अवजड उद्योग मंत्रालय

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी अवजड उद्योग मंत्रालयाच्या पुण्यातील C4i4 प्रयोगशाळेतील समर्थ उद्योग केंद्राच्या वतीने उद्योग 4.0 वर आधारित चैतन्यपट चित्रफीतीचे प्रकाशन

Posted On: 24 AUG 2021 9:09PM by PIB Mumbai

 

स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करण्यासाठी, पुण्यातील C4i4 प्रयोगशाळेतील अवजड उद्योग मंत्रालयाच्या समर्थ उद्योग केंद्रात "उद्योग 4.0 वर आधारित चैतन्यपट चित्रफीतीचे प्रकाशन "या कार्यक्रमाचे काल आयोजन करण्यात आले होते. एका संघटनेमधील विविध लोकांच्या गटांसाठी  कौशल्यविकास वाढविण्यासाठी आणि डिजीटायझेशन आणि उद्योग 4.0 समजून घेण्यासाठी मदत करण्याच्या  दृष्टीने पुण्यातील C4i4 प्रयोगशाळेतील अवजड उद्योग मंत्रालयाचे समर्थ उद्योग केंद्र  विविध क्षमता बांधणी विकास कार्यक्रम विकसित करत आहे. C4i4 प्रयोगशाळेने विशेषतः कामगारांसाठी  एक कार्यक्रम विकसित केला आहे.

हा कार्यक्रम प्रेक्षकांची गैर तांत्रिक पार्श्वभूमी. लक्षात घेऊन तयार करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचा विषय सोपा , सहज समजणारा आहे. हा कार्यक्रम परस्परसंवादी असून या कार्यक्रमाच्या चित्रफितीत द्विमितीय आणि त्रिमितीय कलाकृतींच्या चैतन्यपटाचे  संयोजन आहे. या कार्यक्रमाचे कथानक हिंदी, मराठी आणि इंग्रजी या 3 वेगवेगळ्या भाषांमध्ये आहे.  संवादात्मक सत्रासह हा कार्यक्रम 2 भागांमध्ये विभागलेला आहे. उद्योग 4.0 म्हणजे  चौथी औद्योगिक क्रांती असून जे  उत्पादनाचे  सायबर - भौतिक परिवर्तन आहे., उद्योग 4.0 ची व्याख्या "उत्पादन तंत्रज्ञानामध्ये स्वयंचलन आणि माहितीचा विनिमयामधील सध्याचे कल;'' अशी करण्यात आली असून यात  सायबर-भौतिक प्रणाली, इंटरनेटशी संबंधित गोष्टी, क्लाउड कॉम्प्युटिंग आणि कॉग्निटिव्ह कॉम्प्युटिंग आणि स्मार्ट फॅक्टरी तयार करणे याचा समावेश आहे.

***

N.Chitale/S.Chavan/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1748692) Visitor Counter : 272