PIB Headquarters
azadi ka amrit mahotsav

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधितबातमीपत्र

Posted On: 23 AUG 2021 8:55PM by PIB Mumbai

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image0020FX3.png https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image001BPSF.jpg

  • 58.25 Crore vaccine doses have been administered so far under Nationwide Vaccination Drive
  • 25,072 new cases in the last 24 hours; lowest in 160 days
  • Active cases account for 1.03% of total cases; lowest since March 2020
  • India's Active caseload stands at 3,33,924; lowest in 155 days
  • Recovery Rate increases to 97.63%; Highest since March 2020
  • 44,157 recoveries in the last 24 hours increases Total Recoveries to 3,16,80,626
  • Weekly Positivity Rate (1.91%) less than 3% for last 59 days
  • Daily positivity rate (1.94%) less than 3% for last 28 days
  • 50.75 crore Total Tests conducted so far(Total)

#Unite2FightCorona

#IndiaFightsCorona

Image

Image

Image

नवी दिल्‍ली/मुंबई, 23 ऑगस्‍ट 2021

 

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19 घडामोडींवरील माहिती

आज सकाळी 8 वाजता आलेल्या अहवालानुसार भारतातील कोविड प्रतिबंधक लसीकरण आता 58.25 कोटींचा (58,25,49,595) टप्पा पार करत आहे. यासाठी 64,69,222 सत्रे आयोजित करण्यात आली होती. देशातील कोविड प्रतिबंधक लसीकरणाचा आवाका व वेग वाढवण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध आहे.

गेल्या 24 तासांत 44,157 रुग्ण रोगमुक्त झाले असून या महामारीची सुरुवात झाल्यापासून रोगमुक्त झालेल्यांची संख्या आता 3,16,80,626 झाली  आहे. परिणामी, भारतातील रोगमुक्ती दर मार्च 2020 पासून सर्वात उच्चांकी पातळीवर म्हणजेच 97.63% आला आहे. गेल्या 24 तासांत 25,072 नवीन रुग्ण आढळले, ही गेल्या 160 दिवसांतील सर्वात कमी आकडेवारी आहे.

केंद्र सरकार तसेच राज्ये व केंद्रशासित प्रदेशांच्या संयुक्त व अथक  प्रयत्नांमुळे नवे रुग्ण आढळण्याचा दैनंदिन दर गेले सलग 57 दिवसांमध्ये 50,000 पेक्षा खालीच राहिला आहे.

देशभरातील कोविड चाचण्यांची क्षमता सतत वाढत आहे. गेल्या 24 तासांत 12,95,160 चाचण्या करण्यात आल्या. आतापर्यंत भारताने एकूण 50,75,51,399 चाचण्या केल्या आहेत. चाचण्यांची क्षमता वाढवत असतानाच , साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर गेल्या 59 दिवसांतील सर्वात नीचांकी पातळीवर म्हणजे 1.91% पर्यंत आला आहे. दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर देखील 1.94% पर्यंत खाली आला आहे. दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर गेल्या 28 दिवसांत 3% च्या खालीच राहिला असून गेल्या सलग 77 दिवसांत तो 5% च्या खाली राहिला होता.

 

इतर अपडेट्स :

  • राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश यांच्याकडील कोविड-19 लसीच्या मात्रांच्या उपलब्धते विषयीची अद्ययावत माहिती.
  • जैवतंत्रज्ञान विभाग क्षयरोगाच्या रुग्णांवर गंभीर कोविड -19 संसर्गाचा होणारा परिणाम अभ्यासण्यासाठी ब्रिक्स देशांसोबत सहकार्याने सार्स-कोव्ही-1 एनजीएस-ब्रिक्स संघ तसेच बहुकेंद्रित कार्यक्रमाची अंमलबजावणी करत आहे.

 

Important Tweets

 

 

 

 

 

 

 

 

 

 

* * *

S.Patil/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1748387) Visitor Counter : 155