शिक्षण मंत्रालय

केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते राष्ट्रीय शिक्षण धोरणासंबंधी काही उपक्रमांचा आरंभ आणि राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या अंमलबजावणीनंतर वर्षभरातील कामगिरीविषयीच्या एका पुस्तिकेचे प्रकाशन होणार

Posted On: 23 AUG 2021 7:03PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 23 ऑगस्‍ट 2021

 

राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020च्या अंमलबजावणीच्या वर्षपूर्तीनिमित्त शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाने राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या अंमलबजावणीनंतर केलेल्या कामगिरीविषयी एक पुस्तिका तयार केली आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते 24 ऑगस्ट 2021 रोजी या पुस्तिकेचे दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून प्रकाशन होईल. या पुस्तिकेशिवाय राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 संबंधी काही इतर उपक्रमांचाही शिक्षण मंत्री शुभारंभ करतील.

यामध्ये निपुण भारत हे मूलभूत साक्षरता आणि संख्याज्ञान यासंबंधीचे शैक्षणिक साधन व निपुण भारत लागू करण्यासाठी पाचशे आणि केंद्रशासित प्रदेशांना तसेच शिक्षकांना सहाय्यकारी करणारे वेगळे मूलभूत साक्षरता आणि संख्याज्ञान यासाठीचे DIKSHA वरील संसाधने, व्हर्च्युअल थेट वर्ग आणि व्हर्चुअल प्रयोगशाळा यांच्यासारखे सुधारित डिजिटल शिक्षणासाठीच्या मंचाच्या माध्यमातून खुल्या शिक्षणासाठीच्या राष्ट्रीय संस्था म्हणजेच NIOS च्या व्हर्च्युअल शाळा, NCERT चे पर्यायी 2021- 22 या वर्षासाठीचे शैक्षणिक वेळापत्रक आणि त्यातील अध्ययन फलनिष्पत्तीच्या अनुषंगाने असलेले रोचक आणि आव्हानात्मक साप्ताहिक उपक्रम , अभ्यासक्रमातील किंवा पाठ्यपुस्तकालील संकल्पना आणि धडे यांचे साप्ताहिक वेळापत्रक यांचा समावेश असेल.

केंद्रीय शिक्षण मंत्री आणि सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्री विरेन्द्र कुमार यांच्या हस्ते प्रिया या NCERT ने काढलेल्या पुस्तिकेचेही प्रकाशन होईल. सर्वसमावेशक शिक्षणाच्या दृष्टीने मुलांच्या घडणीच्या वर्षामध्ये त्यांच्यामध्ये सक्षमतेचे विचार आणि सवयी रुजवण्यासाठी प्रिया ही NCERT ने दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या सहकार्याने तयार केलेली पुस्तिका आहे.

राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 हे संपूर्ण शिक्षण पद्धतीत सर्व स्तरांवर महत्वपूर्ण बदल घडवून आणत असल्यामुळे राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 लागू करण्यासाठी शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग कसून काम करत आहे आणि या विभागाने राष्ट्रीय शिक्षण धोरण लागू करण्यासाठी SARTHAQ हा दिशादर्शक आणि सर्वसमावेशक कार्यक्रम हाती घेतला आहे. एका वर्षात या विभागाने शालेय शिक्षण क्षेत्रात बदल घडवून आणणारे अनेक मैलाचे दगड पार केले. यामध्ये मुलभूत साक्षरता आणि संख्याज्ञान यासंबंधीचे निपुण भारत मिशन, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची सुसंगत अशी समग्र शिक्षण योजना, राष्ट्रीय डिजिटल शिक्षण आराखडा (NDEAR), NISHTHA माध्यमिक शिक्षकांची क्षमतावाढ, मूल्यमापनातील सुधारणा, DIKSHA वरील डिजिटल कन्टेन्ट इत्यादींचा समावेश आहे.

विभागाचे वरिष्ठ अधिकारी स्वायत्त शिक्षण संस्थांचे अध्यक्ष तसेच सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या शालेय शिक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित असतील. कार्यक्रमानंतर निपुण भारत योजनेच्या यश संपादनाच्या दृष्टीने राज्य आणि केंद्रशासित प्रदेश व SCERTs यांच्यासह एक कार्यशाळा होईल .

 

* * *

S.Patil/V.Sahajrao/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1748321) Visitor Counter : 130