संरक्षण मंत्रालय
संरक्षणमंत्री श्री राजनाथ सिंह, ऑलिंपिक मधे सहभागी झालेल्या सैन्यसेवेतील कर्मचाऱ्यांचा आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट, पुणे येथे उद्या सत्कार करणार
Posted On:
22 AUG 2021 3:11PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 22 ऑगस्ट 2021
ठळक मुद्दे
- टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणारे सुवर्णपदक विजेता सुभेदार नीरज चोप्रा आणि इतर सैन्यसेवेतील कर्मचारी या समारंभात उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
- संरक्षणमंत्री एएसआय आणि जवानांच्या होतकरू खेळाडू संघांसोबत संवाद साधतील
- श्री राजनाथ सिंह दक्षिण कमांडच्या मुख्यालयाला भेट देणार आहेत
- लष्करप्रमुख आणि दक्षिण विभागाचे लष्कर कमांडर संरक्षणमंत्र्यांसोबत असणार
संरक्षणमंत्री श्री. राजनाथ सिंह दिनांक 23 ऑगस्ट 2021 रोजी आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट (एएसआय) पुणे येथे ऑलिम्पिक मध्ये सहभागी झालेल्या सर्व सैन्यसेवा कर्मचाऱ्यांचा सत्कार करणार आहेत. नुकत्याच पार पडलेल्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणारे सर्व सशस्त्र दलाचे जवान, ज्यात भालाफेक खेळातील सुवर्णपदक विजेता सुभेदार नीरज चोप्रा याचा समावेश आहे, हे सर्वजण या समारंभाला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. श्री राजनाथ सिंह आपल्या या भेटीदरम्यान एएसआय आणि सैन्यातील होतकरु खेळाडू आणि त्यांच्या संघांशी संवाद साधतील. ते यावेळी दक्षिण कमांडच्या मुख्यालयाला देखील भेट देतील. संरक्षणमंत्र्यांसोबत लष्करप्रमुख जनरल एमएम नरवणे आणि दक्षिण कमांडचे जनरल ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ लेफ्टनंट जनरल जे.एस.नैन हेसुद्धा असतील.
भारतीय सैन्य हा नेहमीच भारतीय खेळांचा कणा राहिला आहे - मेजर ध्यानचंद ते सुभेदार नीरज चोप्रा पर्यंत अनेकांनी भारतीय खेळांच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी आपली नावे कोरलेली आहेत. ऑलिम्पिकसह आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदके जिंकण्याच्या उद्देशाने आणि खेळांचे मानदंड उंचावण्यासाठी भारतीय लष्करामार्फत 'मिशन ऑलिम्पिक' हा कार्यक्रम 2001 मध्ये हाती घेण्यात आला होता.
एएसआय, पुणे ही भारतीय सैन्याची एक वैशिष्ट्यपूर्ण आणि जागतिक दर्जाची क्रीडा संस्था आहे आणि तीने 34 ऑलिंपिक विजेते खेळाडू, 22 राष्ट्रकुल क्रीडा पदक विजेते, 21 आशियाई क्रीडा पदक विजेते, सहा युवा क्रीडा पदक विजेते आणि 13 अर्जुन पुरस्कार विजेते निर्माण केले आहेत. या खेळाडूंच्या समर्पणाव्यतिरिक्त, त्यांच्या यशाचे श्रेय एएसआयमधील सहाय्यक कर्मचाऱ्यांचे परीश्रम यालाही आहे.
एएसआय, पुणे ही एक प्रमुख क्रीडा प्रशिक्षण संस्था म्हणून विकसित झाली आहे, ज्यायोगे आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार करण्यासाठी, प्रतिभा ओळखणे, पद्धतशीर प्रशिक्षण प्रदान करणे, जागतिक दर्जाचे शिक्षण, क्रीडा वैद्यकीयज्ञान सहाय्य, यासारख्या अनेक चांगल्या पायाभूत सुविधा सशस्त्र दलांच्या समन्वयाने उपलब्ध करून राष्ट्रीय खेळ फेडरेशन आणि इतर क्रीडा संस्था यांच्या स्पर्धांकरीता, आंतरराष्ट्रीय स्तरावर आणि आंतरराष्ट्रीय प्रदर्शनासह सैन्य सेवादलातील खेळाडू कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित केले जात असते.
M.Chopade/S.Patgaonkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1748015)
Visitor Counter : 290