राष्ट्रपती कार्यालय

ओणमच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींकडून देशवासियांना शुभेच्छा

Posted On: 20 AUG 2021 9:28PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 20 ऑगस्ट 2021

राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी ओणमच्या पूर्वसंध्येला देशवासियांना  शुभेच्छा दिल्या  आहेत.

राष्ट्रपतींनी एका संदेशात म्हटले आहे की, ओणमच्या पवित्र प्रसंगी  मी सर्व देशवासियांना  विशेषत: देशात आणि परदेशात राहणाऱ्या केरळच्या बंधू -भगिनींचे अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो.

शेतात नवीन पिकाच्या कापणीची  आठवण म्हणून साजरा होणारा हा सण शेतकऱ्याची अथक मेहनत आणि निसर्गाप्रती कृतज्ञता दर्शवतो. हा सण समाजातील सौहार्द, प्रेम आणि बंधुत्वाचा संदेश देखील देतो.

या निमित्ताने आपण सर्वांनी मिळून आपल्या देशाच्या प्रगती आणि समृद्धीच्या दिशेने  एकजुटीने पुढे जाण्याचा संकल्प करूया .

राष्ट्रपतींचा संदेश पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

M.Chopade/S.Kane/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1747723) Visitor Counter : 152