कोळसा मंत्रालय

शक्य तेवढी झाडे लावणे याहून निसर्ग आणि मानवाची मोठी सेवा नाही, केंद्रीय कोळसामंत्री प्रल्हाद जोशी यांचे प्रतिपादन


"आजादी का अमृत महोत्सव" अंतर्गत एका महत्वपूर्ण उपक्रमात कोळसा क्षेत्रात वृक्षलागवडीचा उपक्रम बारा राज्यांमध्ये राबविण्यात आला.

दोन पर्यावरण उद्यानांचे उद्घाटन अजून 2 पर्यावरण उद्यानांसाठी कोनशिला

Posted On: 19 AUG 2021 8:24PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 19 ऑगस्‍ट 2021 

 

केंद्रीय कोळसा व खाणकाम मंत्रालय संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी वृक्ष लागवडीचे महत्त्व अधोरेखित केले. शक्य तेवढी झाडे लावणे याहून निसर्ग आणि मानव यांची मोठी सेवा नाही, असे त्यांनी सांगितले.

आज 'वृक्षारोपण अभियान 2021' या राष्ट्रव्यापी मोहिमेचा शुभारंभ करताना मंत्रीमहोदयांनी आजच्या वृक्षलागवडीचा फायदा पुढे पिढ्यान् पिढ्या मिळत राहील असे आपल्या संदेशात सांगितले.

 

वृक्षारोपण अभियानामुळे झाडे लावण्याबद्दल कर्मचारी, समाजातील इतर संबंधित व्यक्ती यांच्यामध्ये वृक्षारोपणाबद्दल जागृती होईल आणि प्रत्येकालाच आसपासच्या परिसरात झाडे लावण्यासाठी आणि परिसराची शोभा वाढवण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. प्रल्हाद जोशी यांनी प्रत्येकाला किमान एक झाड प्रत्येक वर्षी लावण्याचे आवाहन केले आपल्या डोळ्यासमोर छोटे रोप वाढत असताना आपल्याला असे जीवन वाढवण्याचा आनंद मिळतो, जे अनेक मानवी जीवनांना आधार देते.

कोळसा मंत्रालयातर्फे 2021 च्या ऑगस्टमध्ये कोळसा, खाणकाम आणि रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण अभियान आयोजित करण्यात आले होते. यावेळी कोळसा खात्याचे सचिव आणि कोळसा मंत्रालयातील इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 

या कार्यक्रमात केंद्रीय कोळसा खाणकाम आणि संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी केलेल्या वृक्षारोपणाचा व्हिडिओ दाखवून वृक्षारोपण अभियान 2019 साठी त्यांनी दिलेला संदेश वाचून दाखवण्यात आला.

सार्वजनिक सेवा क्षेत्रातील कोळसा आणि लिग्नाइट कंपन्यांचे अधिकारी, कर्मचारी याशिवाय महत्वाच्या मान्यवर व्यक्ती तसेच वेगवेगळ्या कोळसा क्षेत्रातील स्थानिक या सर्वांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून या कार्यक्रमाला हजेरी लावली.

        

Participants connected through VC( MoC and Coal Companies)   Address by Hon’ble Minister of State for Coal, Mines and Rail

Inauguration of Mudwani Dam Eco-park of NCL in Singrauli, MP

Plantation at Gevra OC site of SECL

* * *

M.Chopade/V.Sahajrao/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1747483) Visitor Counter : 210