संरक्षण मंत्रालय

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी डिफेन्स इंडिया स्टार्टअप चॅलेंज 5.0 चा प्रारंभ केला


स्वयंपूर्ण संरक्षण उद्योग उभारण्यासाठी खासगी क्षेत्राने योगदान देण्याचे केले आवाहन; शक्य ती सर्व मदत पुरवण्याचे दिले आश्वासन

Posted On: 19 AUG 2021 5:57PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 19 ऑगस्‍ट 2021

 

संरक्षण मंत्र्यांच्या भाषणाची ठळक वैशिष्ट्ये:

  • DISC 5.0 हे एक आत्मनिर्भर संरक्षण क्षेत्र निर्माण करण्याच्या सरकारच्या संकल्पाचे प्रतिबिंब आहे
  • नवसंशोधन , संरचना  आणि विकास नव्या  उंचीवर नेण्याचे आव्हान आहे
  •  मजबूत सैन्य आणि 'आत्मनिर्भर' संरक्षण उद्योग उभारण्यात आयडेक्स महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे
  • ‘आत्मनिर्भर भारत’ उभारण्यासाठी खाजगी क्षेत्राला सरकारकडून  मदत

 

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 19 ऑगस्ट, 2021 रोजी  इनोवेशन फॉर डिफेंस एक्सलेंस -डिफेन्स इनोव्हेशन ऑर्गनायझेशन (iDEX -DIO) अंतर्गत डिफेन्स इंडिया स्टार्टअप चॅलेंज (DISC) 5.0 चा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे प्रारंभ केला.  सेवांची  13 आणि संरक्षण सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम (DPSUs) ची 22-अशा पस्तीस समस्या विवरणचे DISC 5.0 अंतर्गत अनावरण करण्यात आले. परिस्थितीजन्य जागरूकता, वर्धित  वास्तविकता, कृत्रिम बुद्धिमत्ता, विमान-प्रशिक्षक, घातक नसलेली  उपकरणे, 5 जी नेटवर्क, अंडर वॉटर डोमेन जागरूकता, ड्रोन स्वार्म्स  आणि डेटा कॅप्चरिंग या क्षेत्रांमध्ये या समस्या आहेत. नजीकच्या काळात सैन्य लाभ  सुनिश्चित करण्यासाठी तयार केलेले समस्या विवरण  आतापर्यंतच्या कोणत्याही आवृत्तीमधील सर्वाधिक आहेत.

IDEX-DIO च्या प्रयत्नांचे कौतुक करताना, राजनाथ सिंह यांनी आपल्या भाषणात, देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना याचा शुभारंभ होत असल्यामुळे DISC 5.0  संरक्षण क्षेत्रातल्या  स्वातंत्र्याच्या दिशेने आणखी एक पाऊल असल्याचे त्यांनी सांगितले. DISC 5.0 हे 'आत्मनिर्भर' संरक्षण क्षेत्र निर्माण करण्याच्या सरकारच्या संकल्पाचे प्रतिबिंब असल्याचे सांगत त्यांनी विश्वास व्यक्त केला की हे आव्हान त्याच्या आधीच्या आवृत्तीतून पुढे जाईल आणि नावीन्यपूर्ण संशोधन , संरचना  आणि विकासाला नव्या  उंचीवर नेईल. DISC 5.0 मध्ये अनावरण केलेल्या समस्या विवरणे  तरुण उद्योजक आणि नवसंशोधकांचा   DISC वरील विश्वास दाखवतात.

जगातील झपाट्याने बदलणारी  भौगोलिक-राजकीय आणि सुरक्षा  परिस्थिती लक्षात घेऊन संरक्षण मंत्र्यांनी एक मजबूत, आधुनिक आणि सुसज्ज लष्कर आणि तितकेच सक्षम आणि स्वयंपूर्ण  संरक्षण उद्योग निर्माण करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले, हे स्वप्न साकारण्यासाठी आयडेक्स एक व्यासपीठ उपलब्ध करून महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे , ज्यात सरकार, सेवा, धोरणकर्ते, उद्योग, स्टार्टअप आणि नवसंशोधक  एकत्र काम करून संरक्षण आणि एरोस्पेस क्षेत्रांना पूर्ण क्षमतेपर्यंत पोहोचण्यास मदत करू शकतात.

“डिफेन्स इंडिया स्टार्टअप चॅलेंज आणि खुली आव्हाने आपल्या  तरुणांना आणि उद्योजकांना अनेक संधी प्रदान करतात. भारताच्या विज्ञान, तंत्रज्ञान आणि संशोधनाच्या क्षमता अधोरेखित करून संरक्षण विषयक अभिनवता आणि क्षमतांना नवी दिशा देतात ”, असे राजनाथ सिंह म्हणाले. ते पुढे म्हणाले की iDEX4fauji हा एक असाच उपक्रम आहे जो सेवा कर्मचाऱ्यांना या क्षेत्रातील त्यांची प्रतिभा दाखवण्याची संधी देतो.

पुढील पाच वर्षांत iDEX पाच पटीने अधिक स्टार्ट-अप्सना मदत करेल, असा विश्वास व्यक्त करत ते म्हणाले की  प्रगतीला गती देणे, खर्च कमी करणे आणि निर्धारित वेळेत खरेदी पूर्ण करणे हे याचे उद्दिष्ट आहे.

त्यांनी खाजगी क्षेत्राला पुढे येऊन स्वयंपूर्ण संरक्षण क्षेत्र निर्माण करण्यासाठी योगदान देण्याचे आवाहन केले आणि सरकारकडून शक्य ती सर्व मदत पुरवण्याचे  आश्वासन दिले.

 

 

 

 

* * *

M.Chopade/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1747425) Visitor Counter : 358