आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

कोविड- 19 बाबतची अद्ययावत माहिती

Posted On: 19 AUG 2021 9:16AM by PIB Mumbai

राष्ट्रव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लसीच्या 56 कोटी 64 लाख मात्रा देण्यात आल्या

भारतात गेल्या 24 तासांत 36,401 नव्या कोरोना बाधितांची नोंद झाली.

सध्याच्या कोविड सक्रीय रुग्णांची संख्या आतापर्यंतच्या एकूण कोविड बाधित रुग्णसंख्येच्या 1.13%; मार्च 2020 पासूनच्या सर्वात नीचांकी पातळीवर

देशात सध्या 3,64,129 कोविड सक्रीय रुग्ण आहेत, ही गेल्या 149 दिवसांतील सर्वात कमी रुग्णसंख्या आहे

रोगमुक्ती दरात वाढ होऊन सध्या तो मार्च 2020 पासूनच्या सर्वात उच्चांकी पातळीवर म्हणजे 97.53% आहे

गेल्या 24 तासांत 39,157 कोरोना रुग्ण रोगमुक्त झाले; आता एकूण रोग्मुक्तांची संख्या 3,15,25,080 आहे

साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर (1.95%) गेले 55 दिवस 3% पेक्षा कमी

दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर (1.94%) गेले 24 दिवस 3% पेक्षा कमी

आतापर्यंत कोविड संसर्ग तपासणीच्या एकूण 50 कोटी 3 लाख चाचण्या करण्यात आल्या

***

STupe/SanjanaC /DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1747300) Visitor Counter : 260