आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
भारतीय वैदयकीय संशोधन परिषद (आसीएमआर), आणि स्वित्झर्लंडच्या जीएआरडीपी फाऊंडेशन यांच्यातील अँटीमायक्रोबायल रेझिस्टन्स रिसर्च अँड इनोवेशन संबंधित सामंजस्य कराराला केन्द्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
Posted On:
18 AUG 2021 7:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 18 ऑगस्ट 2021
पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केन्द्रीय मंत्रिमंडळाला आज भारतीय वैदयकीय संशोधन परिषद(आयसीएमआर), आणि स्वित्झर्लंडच्या जीएआरडीपी फाऊंडेशन यांच्यात झालेल्या अँटीमायक्रोबियल रेझिस्टन्स रिसर्च अँड इनोवेशन संबंधित सामंजस्य कराराची माहिती देण्यात आली. आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक आणि तंत्रज्ञान विषयक आघाडीच्या अधीन राहून परस्पर संबंध दृढ करणे आणि समान हिताच्या क्षेत्रात सहकार्याला चालना देण्यासाठी मार्च 2021 मधे भारताने या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे.
फायदे:
या सामंजस्य करारामुळे आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक आणि तंत्रज्ञान विषयक आघाडीच्या चौकटी अंतर्गत भारत आणि स्वित्झर्लंडमधील संबंध दृढ होतील आणि समान हिताच्या क्षेत्रात सहकार्याला चालना दिली जाईल.
आर्थिक परिणाम :
आयसीएमआर-जीएआरडीपी सहकार्यामध्ये समान उद्दिष्टांची यशस्वीता सुनिश्चित करण्यासाठी दोन्ही पक्षांकडून आर्थिक आणि पद्धती याबाबतच्या योगदानासाठी धोरण आणि कार्यपद्धती स्थापित करणे समाविष्ट असेल. निधी थेट इतर पक्षांना किंवा प्रकल्पांमध्ये गुंतलेल्या तिसऱ्या पक्षांना प्रदान केला जाऊ शकतो. सर्व आर्थिक प्रकारचे योगदान स्वतंत्रपणे कायदेशीर कराराच्या अधीन असतील.
आयसीएमआर, बाह्य तसेच अंतर्गत अशा दोन्ही पातळीवरील संशोधनाद्वारे देशात जैववैद्यकीय संशोधनाला प्रोत्साहन देते. जीएआरडीपी देखील ना-नफा तत्वावर संशोधन आणि विकास कार्य करणारी संस्था आहे. नवीन किंवा सुधारित अँटीबायोटिक उपचार विकसित आणि वितरीत करून ती जागतिक सार्वजनिक आरोग्याच्या गरजा पूर्ण करते, तसेच त्यांच्या शाश्वततेच्या सुनिश्चिततेसाठी प्रयत्न करते.
* * *
S.Patil/V.Ghode/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1747119)
Visitor Counter : 220