ईशान्य क्षेत्र विकास मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

ईशान्य प्रादेशिक कृषी विपणन महामंडळ लिमिटेडच्या पुनरुज्जीवनाला मंत्रिमंडळाची मंजुरी


77. 45 कोटी रुपयांचे (निधीवर आधारित साहाय्य 17 कोटी रुपये आणि बिगर निधी आधारित साहाय्यासाठी 60.45 कोटी रुपये) पुनरुज्जीवन पॅकेज

Posted On: 18 AUG 2021 6:30PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 18 ऑगस्‍ट 2021

 

पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहारविषयक समितीने ईशान्य प्रादेशिक कृषी विपणन महामंडळ लिमिटेडच्या  पुनरुज्जीवनासाठी 77.45 कोटी रुपये (निधी आधारित साहाय्यासाठी  17 कोटी आणि बिगर  निधी आधारित साहाय्यासाठी  60.45 कोटी रुपये) नवनिर्माण  पॅकेज मंजूर केले आहे. ईशान्य प्रादेशिक कृषी विपणन महामंडळ, ईशान्य क्षेत्र विकास मंत्रालयाच्या  प्रशासकीय नियंत्रणाखालील एक केंद्रीय सार्वजनिक क्षेत्र  उपक्रम आहे.

 

फायदे:

हे पुनरुज्जीवन  पॅकेज चांगल्या कृषी  सुविधा पुरवणे , शेतकऱ्यांना समूहात  प्रशिक्षण देणे, सेंद्रीय बियाणे आणि खत पुरवणे,  जागतिक बाजारपेठेत ईशान्येकडच्या शेतकऱ्यांच्या उत्पादनांना विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून चालना  देण्यासाठी कापणीनंतरच्या सुविधा, जीआय (भौगोलिक संकेतांक) नोंदणी  इत्यादी  विविध नाविन्यपूर्ण योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी महामंडळाला मदत करेल.

महामंडळाचा महसूल वाढेल आणि स्वेच्छा निवृत्ती व इतर खर्च कमी करण्याच्या उपाययोजनांमुळे आर्थिक भार कमी होईल आणि महामंडळ शाश्वत प्रकारे नफा मिळवू शकेल. भारत सरकारच्या कर्जावरील अवलंबित्व कमी होईल.

 

रोजगार निर्मितीची क्षमता:

महामंडळाच्या नवनिर्माण योजनेच्या अंमलबजावणीनंतर कृषी क्षेत्रात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होईल. 33,000 व्यक्तींसाठी रोजगार निर्मिती अपेक्षित आहे.

 

लक्ष्य:

एफपीओ आणि इतर उत्पादकांना प्रोत्साहन. याशिवाय, बांबू लागवड आणि मधमाशी पालनावर लक्ष केंद्रित करणे, भारत सरकारच्या पंतप्रधान किसान संपदा योजना आणि आत्मनिर्भर भारत योजनेखाली कृषी पायभूत सुविधा निधी, कृषी उडान आणि किसान रेल्वे यांसारख्या इतर योजनांचा लाभ घेऊन ई कॉमर्सच्या माध्यमातून विक्री करता येऊ शकेल.  उच्च मूल्य  सेंद्रिय पिकांशी संबधित शेतकरी आणि उद्योजक यांच्यात दुवा, "NE Fresh" आणि "ONE" (ऑर्गेनिक नॉर्थ ईस्ट) यासारख्या स्वतःच्या ब्रैंड अंतर्गत  फ्रँचायझी संकल्पनेखाली तसेच नाफेड, ट्रायफेड इत्यादींद्वारे  किरकोळ दुकाने सुरू करणे देखील सुरू करण्याचे नियोजन आहे.

 

* * *

S.Patil/S.Kakade/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1747078) Visitor Counter : 193