राष्ट्रपती कार्यालय
चार देशांच्या राजदूतांनी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून राष्ट्रपतींना नियुक्ती पत्र केल सादर
Posted On:
18 AUG 2021 5:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 18 ऑगस्ट 2021
राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी आज (18 ऑगस्ट 2021) एका आभासी समारंभात होली सी, फेडरल रिपब्लिक ऑफ नायजेरिया, रिपब्लिक ऑफ ऑस्ट्रिया आणि रिपब्लिक ऑफ कोरियाच्या राजदूतांकडून नियुक्ती पत्र स्वीकारली. ज्यांनी आपली नियुक्ती पत्र सादर केली त्यांची नावे पुढीलप्रमाणे -
- महामहिम आर्चबिशप लिओपोल्डो जिरेली, होली सीचे अपोस्टोलिक नन्सिओ
- महामहिम अहमद सुळे, उच्चायुक्त, नायजेरिया
- महामहिम कॅथरीना वायसर राजदूत , ऑस्ट्रिया
- महामहिम चांग जाय-बोक, राजदूत , कोरिया
यावेळी बोलताना राष्ट्रपतींनी राजदूतांचे त्यांच्या नियुक्तीबद्दल अभिनंदन केले आणि भारतातील यशस्वी कार्यकाळासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यांनी नमूद केले की भारताचे चारही देशांशी घनिष्ठ संबंध आहेत तसेच शांतता आणि समृद्धीची एक सामायिक दूरदृष्टी आहे.
राष्ट्रपती कोविंद पुढे म्हणाले की संयुक्त राष्ट्र आणि इतर बहुराष्ट्रीय मंचांवर भारताच्या सहभागामुळे परस्परांसाठी फायदेशीर भागीदारी झाली आहे. विकसनशील आणि कमी प्रतिनिधीत्व असलेल्या देशांचे हित लक्षात घेऊन भारत न्याय्य आणि समान जागतिक व्यवस्थेसाठी वचनबद्ध राहिला आहे.
राजदूत/उच्चायुक्तांनी राष्ट्रपतींना त्यांच्या नेत्यांच्या वतीने शुभेच्छा दिल्या आणि भारताबरोबर संबंध दृढ करण्यासाठी एकत्रितपणे काम करण्याच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला.
* * *
Jaydevi PS/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1746985)
Visitor Counter : 192