इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय- नॅसकॉम आणि संयुक्त राष्ट्र (महिला) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्टार्ट अप उद्योजिका पुरस्कार 2020-21 विजेत्यांची घोषणा
महिलांची सुरक्षा आणि सक्षमीकरणासाठी संयुक्त राष्ट्र (महिला) आणि माय गव्ह कडून (MyGov)अमृत महोत्सव श्री शक्ती चॅलेंज 2021चा प्रारंभ
Posted On:
17 AUG 2021 9:53PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 17 ऑगस्ट 2021
स्टार्टअप इंडिया आणि इन्व्हेस्ट इंडिया कार्यक्रमांद्वारे स्टार्टअप्स आणि उद्योजकांना प्रोत्साहन देणे हे सरकारचे मुख्य क्षेत्र आहे.याच दिशेने,इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय- नॅसकॉम स्टार्ट अप महिला उद्योजिका पुरस्कार हे महिलांमधील उद्यमशीलतेची भावना ओळखण्याची आणि जोपासण्याची पहिली पायरी आहे. तसेच महिलांच्या पुढच्या पिढीला भारतीय डिजिटल युगाचे नेतृत्व करण्यासाठी प्रेरणा देणे जेणेकरून उदयोन्मुख उद्योजकांना प्रोत्साहित करण्यासाठी आदर्श मार्गदर्शक म्हणून त्या काम करतील ,ज्यांचे केवळ देशाच्या अर्थव्यवस्थेतच नव्हे तर सामाजिक समुदायामध्ये देखील योगदान आहे आणि उदयोन्मुख आणि भावी तरुण उद्योजकांसाठी नेतृत्व प्रदान करणे आणि मार्गदर्शक उदाहरणे म्हणून त्यांनी काम करणे.हा या पुरस्काराचा उद्देश आहे.
17 ऑगस्ट 2021 रोजी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी आभासी माध्यमातून आयोजित केलेल्या एका विशेष कार्यक्रमात या पुरस्कारांचे निकाल जाहीर करण्यात आले.टेक स्टार्ट-अप महिला उद्योजकांच्या सहभागासाठी हे पुरस्कार खुले होते आणि देशभरातुन 159 अर्ज प्राप्त होऊन याला उदंड प्रतिसाद मिळाला.
विकसित केलेल्या उत्कृष्ट उत्पादनांसाठी सर्व सहभागी आणि विजेत्यांचे इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान , दूरसंचार आणि रेल्वे मंत्री, श्री अश्विनी वैष्णव यांनी अभिनंदन केले.
माय गव्ह मंचावर आयोजित केलेल्या, अमृत महोत्सव श्री शक्ती चॅलेंज 2021 साठी 17 सप्टेंबर 2021 पर्यंत प्रवेशिका स्वीकारल्या जातील. नामनिर्देशित 10 व्यक्तींची निवड केली जाईल आणि त्यांना मार्गदर्शक कार्यक्रमाद्वारे साहाय्य केले जाईल. आणि प्रत्येक नामनिर्देशित व्यक्तीला त्याच्या कल्पनांच्या संकल्पना सप्रमाण विकसित करण्यासाठी 1,00,000 रुपयांचे अनुदान दिले जाईल.कठोर छाननी प्रक्रियेनंतर, पाच विजेते नोव्हेंबर 2021 मध्ये पंचांद्वारे निवडले जातील.उपाय विकसित करणे, विपणन आणि त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी विजेत्यांना प्रत्येकी 5,00,000 रुपये दिले जातील.
श्री शक्ती चॅलेंज महिलांच्या नेतृत्वाखालील तयार करण्यात आलेल्या उपायांना प्रोत्साहन देण्यासाठी अत्यंत आवश्यक व्यासपीठ प्रदान करते, जे कोविड -19 महामारीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीनंतर पुन्हा उभे राहत असताना, महिलांची सुरक्षा सुधारू शकते,त्यांच्यासाठी आर्थिक लाभ निर्माण करू शकते आणि इतर हजारो महिलांना फायदा करून देऊ शकते, असे भारतातील संयुक्त राष्ट्र महिला प्रतिनिधी, श्रीमती सुझान फर्ग्युसन यांनी सांगितले.
अमृत महोत्सव श्री शक्ती चॅलेंज 2021 बहु-भागीदार विश्वस्त संस्था निधी (कोविड -19) कार्यक्रमांतर्गत राबवले जात आहे.17 ऑगस्ट 2021 पासून अधिक माहिती, नोंदणी तपशील आणि अर्ज मार्गदर्शक तत्त्वांसाठी MyGov येथे https://innovateindia.mygov.in/amrit-mahotsav-shri-shakti-challenge-2021/ ला भेट द्या.
ज्युरी चॉइस पुरस्कार विजेते आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय- नॅसकॉम टेसाठीचे महिला उद्योजिका का आणि महिला उद्योजक प्रवेगक कार्यक्रम विजेत्यांची यादी परिशिष्ट -I , परिशिष्ट -II आणि परिशिष्ट III मध्ये आहे.
M.Chopade/S.Chavan/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1746810)
Visitor Counter : 314