पंतप्रधान कार्यालय
75 व्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल पंतप्रधानांनी मानले जागतिक नेत्यांचे आभार
प्रविष्टि तिथि:
15 AUG 2021 10:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 ऑगस्ट 2021
75व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त सदिच्छा आणि शुभेच्छा दिल्याबद्दल पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी जागतिक नेत्यांचे आभार मानले आहेत.
भूतानच्या पंतप्रधानांच्या ट्विटला उत्तर देताना पंतप्रधान म्हणाले;
"स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्याबद्दल भूतानचे पंतप्रधान लोट्ये त्सेरिंग यांचे धन्यवाद. भूतानसोबत असलेल्या मैत्रीच्या अद्वितीय आणि विश्वासार्ह संबंधांना सर्व भारतीय महत्त्व देतात. ''
ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांच्या ट्विटला उत्तर देताना पंतप्रधान म्हणाले;
"माझे मित्र स्कॉट मॉरिसन यांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल धन्यवाद. मूल्ये आणि उभय देशांमधील लोकांच्या परस्पर मजबूत दुव्यांवर आधारित. ऑस्ट्रेलियासोबतची उत्तरोत्तर वाढत असलेले उत्साहपूर्ण सहकार्य भारताने जपले आहे.''
श्रीलंकेचे पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांच्या ट्विटला उत्तर देताना पंतप्रधान म्हणाले;
"पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांनी दिलेल्या हार्दिक शुभेच्छांबद्दल मी त्यांचे आभार मानतो.भारत आणि श्रीलंका या उभय देशांदरम्यान सहस्त्रवर्षांपासूनचे जुने सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि संस्कृतीचे दुवे आहेत जे आमच्या विशेष मैत्रीचा पाया आहेत.''
नेपाळचे पंतप्रधान, शेर बहादूर देउबा यांच्या ट्विटला उत्तर देताना, पंतप्रधान म्हणाले;
"मी पंतप्रधान शेर बहादूर देउबा यांनी दिलेल्या सदिच्छा आणि शुभेच्छांबद्दल त्यांचे आभार मानतो! आमच्यातील सामायिक सांस्कृतिक, भाषिक, धार्मिक आणि कौटुंबिक संबंधांद्वारे भारत आणि नेपाळचे लोक एकत्र आहेत.''
मालदीवचे अध्यक्ष इब्राहीम मोहम्मद सोलीह यांच्या ट्वीटला उत्तर देताना पंतप्रधान म्हणाले;
"मी अध्यक्ष @ibusolih यांचे शुभेच्छांबद्दल आभार मानतो. मालदीव आपला महत्त्वपूर्ण सागरी शेजारी देश आहे आणि भारत-पॅसिफक क्षेत्रात सुरक्षा, सर्वसमावेशकता आणि भरभराटीसाठीचा भागीदार आहे."
श्रीलंकेचे अध्यक्ष गोत्याबा राजपक्षे यांच्या ट्वीटला उत्तर देताना पंतप्रधान म्हणाले;
"मी अध्यक्ष @GotabayaR यांचे शुभेच्छांबद्दल आभार मानतो आणि भारत-श्रीलंका सर्व क्षेत्रात सहकार्य मजबूत करण्याची आशा बाळगतो."
मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद जगन्नाथ यांच्या ट्वीटला प्रतिसाद देताना पंतप्रधान म्हणाले;
"धन्यवाद, पंतप्रधान प्रविंद जगन्नाथ! भारत आणि मॉरिशसची शतकांपासून मुल्ये आणि परंपरा एक आहेत. हीच आपल्या विशेष मैत्रीचा पाया आहे. @JugnauthKumar"
इस्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांच्या ट्वीटला उत्तर देताना पंतप्रधान म्हणाले;
"धन्यवाद, माननीय पंतप्रधान @naftalibennett तुमच्या शुभेच्छांबद्दल आभार. आपले सरकार आणि नागरिकांमधील मैत्री मजबूत व्हावी यासाठी आणि भारत-इस्रायल सामरिक भागीदारीसाठी एकत्र काम करु."
* * *
S.Thakur/S.Chavan/S.Thakur/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1746193)
आगंतुक पटल : 207
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Malayalam
,
Tamil
,
Kannada
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Odia
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Punjabi
,
Gujarati
,
Telugu