संरक्षण मंत्रालय

राष्ट्रपतींनी ग्रुप कॅप्टन परमिंदर अँटील (26686) फ्लाइंग (पायलट) यांना शौर्य चक्र प्रदान केले

Posted On: 15 AUG 2021 9:00AM by PIB Mumbai

ग्रुप कॅप्टन परमिंदर अँटिल (26686) फ्लाइंग (पायलट) जानेवारी 2020 पासून Su-30 MKI स्क्वाड्रनचे कमांडिंग ऑफिसर आहेत.

21 सप्टेंबर 2020 रोजी, Su-30 विमानाच्या पुढच्या कॉकपिटमध्ये उड्डाणा दरम्यान, त्यांना गुरुत्वाकर्षण शक्ती वेगाने +9G ते -1.5G पर्यंत वेगाने बदलत असल्याचा अनुभव आला, तसेच विमान अनियंत्रित सूचकांसह डावीकडे झुकत होते . अत्यंत उच्च 'जी' स्थितीमुळे निर्मण झालेल्या 'ब्लॅक-आउट' परिस्थितीवर मात करत त्यांनी विमानाचे हेलकावे स्वतःच नियंत्रित केले आणि आपल्या शस्त्र प्रणाली ऑपरेटरची सुरक्षा देखील तपासली. विमानाचे नियंत्रण करताना, संभाव्य बाहेर पडण्याच्या स्थितीत जीवित किंवा मालमत्तेचे नुकसान होऊ नये यासाठी त्यांनी दाट लोकवस्ती असलेल्या क्षेत्रापासून विमान दूर नेले. त्यांनी उड्डाण सावरण्याची सुरवात केल्यावर, विमानाला पुन्हा एकदा दुर्दैवी दोलायनांचा सामना करावा लागला, विमानाच्या नियंत्रणासह पायलटद्वारे नियंत्रण कॉलमवर मोठ्या प्रमाणावर दाब आवश्यक होता. त्यांनी आपले उच्च तंत्रज्ञानाचे ज्ञान वापरून काही अपारंपरिक प्रयत्न केले. त्यांच्या निर्णयामुळे आणि कुशल हाताळणीमुळे, हेलकावे खाणे कमी झाले आणि विमान सुखरूप परत आले. या जीवघेण्या परिस्थितीत वैमानिकांनी आपला संयम राखला, अनुकरणीय धैर्य दाखवले आणि तत्परता दाखवली. त्यांच्या उत्कृष्ट पायलटिंग कौशल्यांमुळे शेकडो कोटी रुपयांच्या राष्ट्रीय मालमत्तेची सुरक्षा सुनिश्चित केली आणि जमीन आणि मालमत्तेचे संभाव्य नुकसान टाळले.

या अपवादात्मक शौर्य, उच्च व्यावसायिकता आणि एरोस्पेस सुरक्षेसाठी दिलेल्या योगदानाबद्दल ग्रुप कॅप्टन परमिंदर अँटिल याना शौर्य चक्र प्रदान करण्यात आले आहे.

***

MaheshC/SushmaKDY/

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1746021) Visitor Counter : 265