माहिती आणि प्रसारण मंत्रालय

थेट प्रक्षेपणासह प्रसारभारती सोबत साजरा करा 75 वा स्वातंत्र्य दिन

Posted On: 13 AUG 2021 10:08PM by PIB Mumbai

 

यंदा भारताचा 75 वा स्वातंत्र्यदिवस स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव म्हणून साजरा करत असताना, लाल किल्ल्याच्या तटबंदीवरुन होणाऱ्या माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाचे थेट प्रक्षेपण दूरदर्शन आणि आकाशवाणीद्वारे आपल्यापर्यंत पोहोचणार आहे.

दूरदर्शन आणि आकाशवाणीवर स्वातंत्र्यदिन सोहळ्याचे प्रसारण स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला 14 ऑगस्ट रोजी संध्याकाळी सात वाजता माननीय राष्ट्रपती श्री. राम नाथ कोविंद यांच्या राष्ट्राला उद्देशून होणाऱ्या भाषणाने सुरु होईल.

40  कॅमेरांच्या माध्यमातून दूरदर्शनवरूवरील स्वातंत्र्यदिन सोहळ्याच्या थेट प्रसारणाद्वारे या 15 ऑगस्टला  लाल किल्यावर पंतप्रधानांच्या हस्ते होणाऱ्या ध्वजारोहणाचा ऐतिहासिक क्षण अधिक विस्तृतपणे  प्रेक्षकांना पाहता येईल.

आकाशवाणीच्या राष्ट्रीय वाहिन्या संपूर्ण सोहळ्याचे इंग्रजी आणि हिंदी भाषेतील थेट समालोचन श्रोत्यांपर्यंत पोहोचवतील. आकाशवाणीवर  दिवसभर विविध देशभक्तीपर आणि सांस्कृतिक कार्यक्रम प्रसारित केले जातील.

दूरदर्शन वाहिन्यांवर, डीडी नॅशनल  यूट्यूब वाहिनीवर  मल्टीपल लाइव-स्ट्रीम्सवर  हाई-डेफ्निशन व्ह्यू  मध्ये या भव्य सोहळ्याच्या प्रसारणाव्यतिरिक्त लाल किल्याच्या तटबंदीच्या 360 अंशातील दृष्यांसह मनोहारी परिदृष्य और दुर्मिळ दृष्यांसह तुमच्या स्मार्टफोनवरही  संपूर्ण प्रसारण पोहोचविण्यात येईल.

15 ऑगस्ट रोजी प्रसार भारतीसह स्वातंत्र्य दिन साजरा करा! दूरदर्शन नेटवर्क, आकाशवाणी सेवा आणि आमच्या डिजिटल मंचाच्या  अनेक वाहिन्यांवरून  थेट सहभागी व्हा!

वर नमूद केलेल्या डीडी नॅशनल यूट्यूब वाहिनीवरील मल्टीपल लाइव-स्ट्रीम्सची  प्लेलिस्ट येथे आहे- 

https://www.youtube.com/playlist?list=PLUiMfS6qzIMxGJdFoUqwuo7C8UBF6w1F7

***

M.Chopade/S.Chavan/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1745622) Visitor Counter : 320