आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

भारतात कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण 51.90 कोटी पेक्षा जास्त


गेल्या 24 तासात 41 लाखाहून अधिक मात्रा देण्यात आल्या

भारताने रुग्ण बरे होण्याचा आतापर्यंतचा 97.45% हा सर्वोच्च दर गाठला

देशात गेल्या 24 तासात कोरोनाचे 38,353 नवे दैनंदिन रुग्ण

देशातली सध्या उपचाराधीन रुग्णसंख्या (3,86,351) ही 140 दिवसातली सर्वात कमी संख्या

देशात सध्या उपचाराधीन रुग्ण हे एकूण रुग्णांच्या 1.21%

दैनंदिन पॉझीटीव्हिटी दर (2.16%) गेले 16 दिवस 3% कमी



Posted On: 11 AUG 2021 10:24AM by PIB Mumbai

भारतात  कोविड-19  प्रतिबंधक लसीकरण 51.90  कोटींहून अधिक झाले आहे. आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार एकूण 59,57,616 सत्रांद्वारे  51,90,80,524 मात्रा देण्यात आल्या आहेत. गेल्या 24 तासात 41,38,646 मात्रा देण्यात आल्या.

यामध्ये यांचा समावेश आहे-

HCWs

1st Dose

1,03,38,727

2nd Dose

80,17,291

FLWs

1st Dose

1,82,42,071

2nd Dose

1,18,74,095

Age Group 18-44 years

1st Dose

18,23,88,445

2nd Dose

1,29,63,932

Age Group 45-59 years

1st Dose

11,34,11,880

2nd Dose

4,35,83,965

Over 60 years

1st Dose

7,92,14,965

2nd Dose

3,90,45,153

Total

51,90,80,524

 

 

21 जून 2021 पासून कोविड-19 सार्वत्रिक लसीकरणाचा नवा टप्पा सुरु झाला आहे. देशभरात कोविड लसीकरणाचा वेग आणि व्याप्ती वाढवण्यासाठी केंद्र सरकार कटीबद्ध आहे.

कोरोनातून बरे होण्याचा दर गेल्या 24 तासात 97.45% झाला असून महामारीची सुरवात झाल्यापासूनचा भारताने गाठलेला हा सर्वोच्च दर आहे.

महामारीच्या सुरवातीपासून कोरोनाची लागण झालेल्यांपैकी एकूण 3,12,20,981 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. गेल्या 24 तासात 40,013 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत.

 


गेल्या 24 तासात 38,353 नव्या दैनंदिन रुग्णांची नोंद झाली.

सलग 45 दिवसांपासून 50,000 पेक्षा कमी नव्या दैनंदिन रुग्णांची नोंद होत असून केंद्र आणि राज्य सरकार/केंद्र शासित प्रदेश यांच्या समन्वित प्रयत्नांचा हा परिणाम आहे.

 

देशात उपचाराधीन रुग्णांची संख्या 3,86,351असून 140 दिवसातली ही सर्वात कमी संख्या आहे. उपचाराधीन रुग्ण, एकूण पॉझिटीव्ह रुग्णांच्या 1.21% आहेत.

चाचण्या करण्याच्या क्षमतेत वाढ करत देशात गेल्या 24 तासात 17,77,962 चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत 48.50 कोटीहून अधिक (48,50,56,507) चाचण्या केल्या आहेत.

साप्ताहिक पॉझीटीव्हिटी दर सध्या 2.34% आणि दैनंदिन पॉझीटीव्हिटी दर आज 2.16% आहे. दैनंदिन पॉझीटीव्हिटी दर गेले 16  दिवस 3% पेक्षा कमी तर सलग 65 दिवस  5% पेक्षा कमी आहे.

***

STupe/NC/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1744726) Visitor Counter : 262