PIB Headquarters

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित बातमीपत्र

Posted On: 09 AUG 2021 9:14PM by PIB Mumbai

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image0020FX3.png https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image001BPSF.jpg

  • 50.86 Cr. vaccine doses have been administered so far under Nationwide Vaccination Drive
  • 3,11,39,457 total recoveries across the country so far
  • Recovery Rate currently at 97.40%
  • 39,686 patients recovered during last 24 hours
  • India reports 35,499 new cases in last 24 hours
  • India's Active caseload currently 4,02,188
  • Active cases constitute 1.26% of total cases
  • Weekly Positivity Rate remains below 5%, currently at 2.35%
  • Daily positivity rate at 2.59%; less than 3% for last 14 days
  • Testing capacity substantially ramped up – 48.17 crore tests conducted(Total)

#Unite2FightCorona

#IndiaFightsCorona

Image

Image

Image

नवी दिल्‍ली/मुंबई, 9 ऑगस्‍ट 2021

 

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19 घडामोडींवरील माहिती

भारताच्या कोविड-19 प्रतिबंधक लसीकरणाने  50.86  कोटींचा टप्पा ओलांडला आहे. आज सकाळी 7 वाजेपर्यंत उपलब्ध माहितीनुसार  एकूण 58,79,068 सत्रांमध्ये,  50,86,64,759 लसीच्या मात्रा देण्यात आल्या. गेल्या 24 तासात 16,11,590 लसीच्या मात्रा देण्यात आल्या. कोविड -19 प्रतिबंधक लसीकरणाच्या नव्या टप्प्याला 21 जून 2021 रोजी सुरुवात झाली आहे. देशभरात लसीकरणाचा वेग आणि व्याप्ती वाढवण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध आहे.

आणखी एका सकारात्मक घडामोडीत, भारताचा रुग्ण बरे होण्याचा दर गेल्या 24 तासांमध्ये 97.40% वर  पोहोचला आहे. महामारीची सुरुवात झाल्यापासून भारताने साध्य केलेला हा आतापर्यंतचा सर्वोच्च दर आहे. भारतात महामारीच्या सुरुवातीपासून ते आतापर्यंत एकूण  3,11,39,457  तर गेल्या 24 तासात 39,686 रुग्ण कोविड-19 संसर्गातून बरे झाले आहेत.

भारतात गेल्या 24 तासात 35,499  नव्या रुग्णांची नोंद झाली. सलग 43 दिवस 50,000 पेक्षा कमी दैनंदिन रुग्णांची नोंद झाली आहे. राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांच्या सातत्यपूर्ण आणि समन्वित प्रयत्नांचे हे फळ आहे.

देशात आज सक्रीय रुग्णसंख्या 4,02,188  इतकी असून ती एकूण रुग्णसंख्येच्या 1.26%  आहे.

चाचण्यांच्या क्षमतेत सातत्याने वाढ होत आहे. गेल्या 24 तासात देशात 13,71,871 चाचण्या करण्यात आल्या. देशात आतापर्यंत एकूण 48 कोटींपेक्षा अधिक (48,17,67,232) चाचण्या करण्यात आल्या आहेत. देशात एकीकडे चाचण्या वाढत असून दुसरीकडे साप्ताहीक पॉझिटीव्हीटी दर सध्या  2.35 % तर दैनंदिन पॉझिटीव्हीटी दर 2.59 % आहे. गेल्या 14 दिवसांपासून दैनंदिन पॉझिटीव्हीटी दर 3% पेक्षा कमी तर सलग 63 दिवस  5% पेक्षा कमी आहे.

 

इतर अपडेट्स :

 

Important Tweets

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

* * *

M.Chopade/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1744228) Visitor Counter : 224


Read this release in: English , Hindi , Punjabi , Gujarati