आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

आता विदेशी नागरिकही भारतातील लसीकरणासाठी पात्र

भारतात वास्तव्यास असण्याऱ्या परदेशी नागरिकांना त्यांचे पारपत्र कोविन पोर्टलवर नोंदणीसाठी ओळख दस्तावेज म्हणून वापरता येईल

Posted On: 09 AUG 2021 7:35PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 9 ऑगस्‍ट 2021

 

भारतात राहणाऱ्या परदेशी नागरिकांना कोविड-19 प्रतिबंधक लस घेण्यासाठी कोविन पोर्टलवर नोंदणी करण्यास परवानगी देणारा, कोविडपासून संरक्षणासंदर्भातील एक महत्वाचे पाऊल म्हणता येईल असा निर्णय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाने घेतला आहे. कोविन पोर्टलवर नोंदणीसाठी ओळख पटवणारा दस्तावेज म्हणून त्यांना त्यांचे पारपत्र वापरता येईल. या पोर्टलवर नोंदणी झाल्यावर त्यांना लसीकरणासाठी वेळ मिळवता येईल.

भारतात विशेषतः महानगरांमध्ये राहणाऱ्या परदेशी नागरिकांची संख्या लक्षणीय आहे. या महानगरांमधील लोकसंख्येच्या  जास्त घनतेमुळे कोविड-19 प्रसाराची शक्यताही मोठीच आहे. अशा संसर्गाची शक्यता लक्षात घेता सर्व पात्र लोकांचे लसीकरण होणे आवश्यक आहे.

भारतात राहणाऱ्या परदेशी नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा महत्वपूर्ण  निर्णय आहे. यामुळे भारतात राहणाऱ्या पण लसीकरण न झालेल्या व्यक्तींकडून संसर्ग पसरण्याची शक्यता मंदावेल. त्यामुळे कोविड-19 संक्रमणापासून एकूणच संरक्षण मिळेल.

राष्ट्रीय कोविड लसीकरण कार्यक्रम हा सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात  16 जानेवारी 2021 पासून सुरू झाला.  आता 18 वर्षे व त्यावरील वयाच्या  सर्व नागरिकांसाठी हे लसीकरण आहे. देशात 9 ऑगस्ट 2021 पर्यंत लसीच्या 51 कोटींहून जास्त मात्रा देण्यात आल्या.


* * *

S.Patil/V.Sahajrao/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai@gmail.com(Release ID: 1744185) Visitor Counter : 99


Read this release in: English , Hindi , Punjabi , Telugu