अल्पसंख्यांक मंत्रालय
'जान है तो जहां है' मोहिमेअंतर्गत अल्पसंख्याकांचे लसीकरण
Posted On:
09 AUG 2021 4:36PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 ऑगस्ट 2021
मंत्रालयाने कोविड -19 लसीकरणाबाबत भीती आणि अफवा रोखण्यासाठी “जान है तो जहां है” ही जागरूकता मोहीम सुरू केली आहे, ज्या अंतर्गत मंत्रालयाशी संबंधित विविध संस्था - राज्य वक्फ बोर्ड, राज्य हज समित्या, राज्य समन्वय संस्था आणि विविध योजनांच्या अंमलबजावणीसाठी मंत्रालयात सूचीबद्ध कार्यक्रम अंमलबजावणी संस्थाना लोकांपर्यंत पोहचण्यासाठी आणि स्थानिक समुदायांमधील लसीबाबत संकोच दूर करण्यासाठी जागरुकता निर्माण करण्याचे आवाहन करण्यात आले होते. मंत्रालय त्याच्या विविध योजनांच्या 80 लाखांहून अधिक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत आहे आणि त्यांना लसीकरणाचे फायदे अधोरेखित करत आहे.
याशिवाय मंत्रालयाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक क्षेत्रातील विविध नामांकित व्यक्तींद्वारे लसीकरणाविषयी जागरूकता पसरवण्यासाठी केला आहे. या मोहिमेसाठी स्वतंत्र निधी जारी करण्यात आलेला नाही.
केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी आज राज्यसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.
* * *
S.Patil/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1744102)
Visitor Counter : 286