संरक्षण मंत्रालय

स्वर्णिम विजय वर्ष विजय ज्योत अंदमान आणि निकोबार बेटांवरील मायाबंदर इथे पोहचली

Posted On: 09 AUG 2021 2:07PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 9 ऑगस्‍ट 2021

 

मुख्य ठळक मुद्दे:

  • विजय ज्योतीबरोबर एएनसीची संयुक्त सेवा सायकल मोहीम
  • किशोरी नगर येथील शासकीय वरिष्ठ माध्यमिक शाळेत ज्योत नेण्यात आली
  • 1971  च्या युद्धात भारताच्या विजयाच्या स्मृतीप्रित्यर्थ हे पथक  मुलांमध्ये जागरूकता निर्माण करणार
  • सायकलस्वारांनी  चार दिवसात 300 किलोमीटरहून अधिक अंतर पार केले

 

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image0014UXW.jpg

अंदमान आणि निकोबार कमांडची संयुक्त सेवा सायकल मोहीम (एएनसी), स्वर्णिम विजय वर्ष  विजय ज्योतीसह 8 ऑगस्ट, 2021 रोजी मायाबंदर येथे पोहोचली. सायकलस्वारांनी चार दिवसांत 300 किलोमीटरहून अधिक अंतर पार केले.  विजय ज्योत किशोरी नगर येथील शासकीय वरिष्ठ माध्यमिक शाळेत नेण्यात आली,  जिथे जिल्हा अधिकारी, सशस्त्र दलाचे जवान  आणि शाळेचे मुख्याध्यापक यांनी तिचे स्वागत केले. विजय ज्योतीच्या सन्मानार्थ शालेय मुलांनी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image002N707.jpg

सायकल मोहीमेच्या  टीमने  1971 च्या युद्धात भारताने मिळवलेल्या विजयाच्या स्मृती जागवण्यासाठी  मुलांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी दृकश्राव्य सादरीकरण केले. सायकलस्वारांनी मुलांना सशस्त्र दलात सामील होण्यासाठी आणि साहस आणि खेळांना त्यांच्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनवण्यासाठी प्रोत्साहित केले. या टीमने जवान , शाळांचे  अधिकारी आणि मुलांना स्मृतीचिन्ह वितरित  केले.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image003Y9L5.jpg

सायकल मोहिम अंतिम टप्प्यात  9 ऑगस्ट 2021 रोजी डिगलीपूर येथील क्रीडा स्टेडियमवर पोहोचेल.

* * *

M.Iyengar/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1744006) Visitor Counter : 219