गृह मंत्रालय

खेलरत्न पुरस्काराचे नाव मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णयाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले स्वागत


"देशाचा सर्वोच्च क्रीडा सन्मान असलेला 'खेलरत्न पुरस्कार' महान क्रीडापटू मेजर ध्यानचंद यांच्या नावाने प्रदान करणे ही त्यांना खरी श्रद्धांजली"

Posted On: 06 AUG 2021 6:42PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 6 ऑगस्‍ट 2021

 

खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलून ते मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार करण्याच्या,  पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांच्या  निर्णयाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी स्वागत केले आहे. अमित शहा यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले  आहे, "देशाचा सर्वोच्च क्रीडा सन्मान 'खेलरत्न पुरस्कार'  महान क्रीडापटू मेजर ध्यानचंद यांच्या नावे प्रदान करणे  ही त्यांना खरी श्रद्धांजली आहे . या निर्णयामुळे क्रीडा विश्वाशी संबंधित प्रत्येक व्यक्तीला अभिमान वाटेल , मी सर्व देशवासियांच्या वतीने पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांचे  अभिनंदन करतो"

 

गृहमंत्री म्हणाले , "'मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार' देशातील प्रत्येक खेळाडूला हॉकीचे जादूगार ध्यानचंद यांचे राष्ट्राप्रती  समर्पण, हॉकीचा  सन्मान वृद्धिंगत करण्याचा  त्यांचा  निर्धार  आणि त्यांच्या  ऐतिहासिक यशापासून प्रेरणा देईल आणि   क्रीडा विश्वात तिरंगा सर्वोच्च स्थानी  उंचावेल, असा मला पूर्ण विश्वास आहे."

 

 

* * *

Jaydevi PS/S.Kakade/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1743334) Visitor Counter : 261