युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
राष्ट्रीय शिक्षण धोरण भारताच्या युवा वर्गाला भविष्यासाठी सज्ज करेल आणि भारतातील मनुष्यबळाला जगात सर्वात कुशल बनवेल :श्री अनुराग सिंह ठाकूर
प्रविष्टि तिथि:
04 AUG 2021 9:15PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 ऑगस्ट 2021
महत्वाचे मुद्दे :
- राष्ट्रीय शिक्षण धोरण (एनईपी) 2020 च्या पहिल्या वर्षपूर्तीनिमित्त युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने ' युवा सक्षमीकरण आणि क्रीडा विकासावर राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 चा प्रभाव' या विषयावर वेबिनारचे आयोजन केले होते.
केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री श्री अनुराग सिंह ठाकूर यांनी या वेबिनारमध्ये प्रमुख अतिथी म्हणून भाषण केले. राष्ट्रीय शिक्षण धोरण (एनईपी) 2020 च्या पहिल्या वर्षपूर्तीनिमित्त युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने ' युवा सक्षमीकरण आणि क्रीडा विकासावर राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 चा प्रभाव' या विषयावर वेबिनारचे आयोजन केले होते.

संबोधित करताना श्री. अनुराग ठाकूर यांनी सांगितले की, राष्ट्रीय शिक्षण धोरण भारताच्या युवा वर्गाला भविष्यासाठी सज्ज करेल आणि जगातील सगळ्यात कुशल कार्यदलात भारताला परावर्तित करण्याचे या धोरणाचे उद्दिष्ट आहे. नवीन शिक्षण धोरणात पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील आत्मनिर्भर भारताच्या उद्देशाला साकार करण्यासाठी निर्धारित केलेल्या स्वरूपात कौशल्य विकासावर भर देण्यासह भारतातील युवा वर्गाच्या सर्वांगीण विकासाची कल्पना मांडण्यात आली आहे. अगदी मध्यम स्तरावरील विद्यार्थ्यांना सुतारकाम, प्लंबिंग, इलेक्ट्रिकल दुरुस्ती , बागकाम, मातीची भांडी तयार करणे , भरतकाम तसेच इतर कौशल्यांचे व्यावसायिक कौशल्य दिले जाईल.या धोरणानुसार, 2025 पर्यंत किमान 50% विद्यार्थ्यांना व्यावसायिक कौशल्य देण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. आम्ही आमच्या युवकांना एक समग्र शैक्षणिक अनुभव देण्यासाठी क्रीडा शक्तीचाही वापर करत आहोत; यामुळे सांघिक भावना आणि बौद्धिक दक्षता निर्माण होईल

* * *
M.Chopade/S.Chavan/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1742527)
आगंतुक पटल : 194