संरक्षण मंत्रालय

भारत-चीन कोर कमांडर स्तरावरील बैठकीची बारावी फेरी - संयुक्त निवेदन

Posted On: 02 AUG 2021 6:55PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 2 ऑगस्‍ट 2021 

 

भारत-चीन कोर कमांडर स्तरावरील बैठकीची बारावी फेरी चुशुल-मोल्डो सीमेवर भारतीय भागात झाली. ही बैठक, भारत आणि पिपल्स रिपब्लिक ऑफ चायना या उभय देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांची 14 जुलै रोजी ड्युशान्बे येथे झालेली बैठक आणि 25 जून रोजी भारत-चीन सीमा व्यवहार सल्लागार आणि समन्वय कामकाज समितीची (WMCC)  झालेली बावीसावी बैठक,  या नंतर झाली.

भारत-चीन सीमारेषेच्या पश्चिम क्षेत्रात प्रत्यक्ष ताबारेषेच्या जवळील मोकळ्या भागासंबधी या बैठकीत दोन्ही बाजूंनी खुली व सखोल मते मांडली गेली. चर्चेची ही फेरी अतिशय उपयुक्त आणि परस्परसामंजस्य वाढवणारी होती असे दोन्ही बाजूंनी म्हटले आहे. चर्चा व वाटाघाटींचा जोर कायम राखत, आधी झालेले करार व नियमावली यांच्या अनुषंगाने राहिलेल्या बाबींबद्दलही  उपाययोजना करण्यात येतील असे दोन्ही बाजूंनी नमूद केले.

दरम्यानच्या काळात, पश्चिम क्षेत्रातील ताबारेषेजवळ स्थैर्य राखण्यासाठी तसेच दोन्ही बाजूंनी शांतता व सौहार्दासाठी एकत्रित प्रयत्न सुरू ठेवण्याचे दोन्ही बाजूंनी मान्य केले.

 

* * *

M.Iyengar/V.Sahajrao/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1741620) Visitor Counter : 214