पंतप्रधान कार्यालय
देश स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असताना देशाला नव्या उंचीवर नेण्यासाठी 130 कोटी भारतीय कठोर मेहनत करतील याविषयी मी आशावादी आहे : पंतप्रधान
Posted On:
02 AUG 2021 12:03PM by PIB Mumbai
नवी दिल्ली 02 ऑगस्ट 2021
आपला देश स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असताना देशाला नव्या उंचीवर नेण्यासाठी 130 कोटी भारतीय कठोर मेहनत करतील याविषयी मी आशावादी आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
ट्वीट संदेशांच्या शृंखलेच्या माध्यमातून पंतप्रधान म्हणाले,
“आपल्या देशाच्या अमृतमहोत्सवी सोहळ्याला ऑगस्ट महिन्याला सुरुवात झालेली असताना, प्रत्येक भारतीयाच्या हृदयाला स्पर्श करतील अशा अनेकानेक घटना घडताना दिसत आहेत. आपल्या देशात विक्रमी संख्येने कोविड प्रतिबंधक लसीकरण झाले आहे. तसेच वस्तू आणि सेवा कर संकलनाची आकडेवारी देशाच्या मजबूत आर्थिक स्थितीची निदर्शक आहे.
पीव्ही सिंधूने टोकियो ऑलिम्पिकमध्ये मिळविलेल्या पदकासाठी ती पात्र होतीच पण पुरुष आणि महिला हॉकी संघांनी देखील या स्पर्धांमध्ये ऐतिहासिक कामगिरी केलेली आपण बघितली. आपला देश स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असताना देशाला नव्या उंचीवर नेण्यासाठी 130 कोटी भारतीय कठोर मेहनत करतील अशी आशा मला आहे.”
***
Jaydevi PS/SC/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1741439)
Visitor Counter : 272
Read this release in:
Kannada
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam