अर्थ मंत्रालय

जुलै 2021 मधील जीएसटी महसूल संकलन


जुलै महिन्यात 1,16,393 कोटी रुपये जीएसटी महसूल संकलित

Posted On: 01 AUG 2021 4:06PM by PIB Mumbai

 

जुलै 2021 महिन्यात एकूण 1,16,393 कोटी रुपये जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर महसूल संकलित करण्यात आला आहे. त्यापैकी सीजीएसटी 22,197 कोटी रुपये, एसजीएसटी 28,541 कोटी रुपये, आयजीएसटी 57,864 कोटी रुपये (वस्तूंच्या आयातीवर जमा 27,900 कोटी रुपयांच्या समावेशासह आणि अधिभार 7,790 कोटी रुपये )वस्तूंच्या आयातीवर संकलित 815 कोटी रुपये संकलनासह) आहे. वरील आकडेवारी मध्ये 1 जुलै 2021 ते 31 जुलै 2021  दरम्यान दाखल करण्यात आलेल्या जीएसटीआर – 3B परताव्यांमधून मिळालेला जीएसटी महसूल तसेच त्याच कालावाधीसाठी आयातीमधून गोळा झालेला अधिभार आणि आयजीएसटी यांचा समावेश आहे.

जून 2021 च्या जीएसटी संकलनाच्या प्रेसनोटमध्ये 1 जुलै ते 5 जुलै 2021 दरम्यान दाखल केलेल्या परताव्यांसाठी 4,937 कोटी रुपयांच्या जीएसटी संकलनाचा देखील समावेश करण्यात आला होता. कोविड महामारीच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर 5 कोटी पर्यंतच्या उलाढाल असणाऱ्या करदात्यांना परतावा दाखल करण्याचा करण्यासाठी माफी / कमी व्याज अशा विविध स्वरूपात सवलतीचे उपाय देण्यात आले होते.

सरकारने नियमित परतावा म्हणून आयजीएसटीमधून 24,100 कोटी रुपये सीजीएसटीला आणि 28,087 कोटी रुपये एसजीएसटीला दिले आहेत.

मागील वर्षी याच महिन्यातील जीएसटी महसुलापेक्षा जुलै 2021 मधील महसूल 33% अधिक आहे. या महिन्यात वस्तूंच्या आयातीमधून मिळणारा महसूल 36% अधिक राहिला आणि देशांतर्गत व्यवहारांमधून (सेवांच्या आयातीसह) मिळणारा महसूल मागील वर्षाच्या याच महिन्याच्या या स्रोतातील महसुलापेक्षा 32 % अधिक राहिला.  

जीएसटी संकलन सातत्याने आठ महिन्यांपर्यंत 1 लाख कोटी रुपयांच्यापेक्षा अधिक झाल्यानंतर जून  2021 मध्ये कमी होऊन 1 लाख कोटी रुपयांच्या टप्प्यावरून खाली आला. जून 2021 महिन्यात  संकलन बऱ्यापैकी मे 2021 चे असते. मे 2021 च्या दरम्यान बहुतांश राज्य / केंद्रशासित प्रदेश हे कोविड महामारीच्या दुसऱ्या लाटेने बाधित, तसेच पूर्ण किंवा अंशतः टाळेबंदीच्या अवस्थेत होते. कोविड संबंधी असलेल्या निर्बंधांमध्ये शिथिलता आल्यानंतर जुलै 2021 मध्ये जीएसटी संकलन पुन्हा 1 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचले. अर्थव्यवस्थेमध्ये वेगाने सुधारणा होत असल्याचाच हा एक संकेत म्हणता येईल. आगामी महिन्यांमध्ये देखील जीएसटी संकलन मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रात जुलै 2020 मधील जीएसटी महसुलाचे संकलन 12,508 कोटी रुपये इतके होते, तर जुलै 2021 मधील जीएसटी महसुलाचे संकलन 18,899 कोटी रुपये इतके झाले. यामध्ये 51 % इतकी वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

पुढील तक्त्यामध्ये जुलै 2020 च्या तुलनेत जुलै 2021 महिन्या दरम्यान जीएसटी महसूलाची राज्यांप्रमाणे असलेली आकडेवारी-

 

Sr No

State

Jul-20

Jul-21

Growth

1

Jammu and Kashmir

298

432

45%

2

Himachal Pradesh

605

667

10%

3

Punjab

1,188

1,533

29%

4

Chandigarh

137

169

23%

5

Uttarakhand

988

1,106

12%

6

Haryana

3,483

5,330

53%

7

Delhi

2,629

3,815

45%

8

Rajasthan

2,797

3,129

12%

9

Uttar Pradesh

5,099

6,011

18%

10

Bihar

1,061

1,281

21%

11

Sikkim

186

197

6%

12

Arunachal Pradesh

33

55

69%

13

Nagaland

25

28

11%

14

Manipur

25

37

48%

15

Mizoram

16

21

31%

16

Tripura

48

65

36%

17

Meghalaya

120

121

1%

18

Assam

723

882

22%

19

West Bengal

3,010

3,463

15%

20

Jharkhand

1,340

2,056

54%

21

Odisha

2,348

3,615

54%

22

Chattisgarh

1,832

2,432

33%

23

Madhya Pradesh

2,289

2,657

16%

24

Gujarat

5,621

7,629

36%

25

Daman and Diu

77

0

-99%

26

Dadra and Nagar Haveli

130

227

74%

27

Maharashtra

12,508

18,899

51%

29

Karnataka

6,014

6,737

12%

30

Goa

257

303

18%

31

Lakshadweep

2

1

-42%

32

Kerala

1,318

1,675

27%

33

Tamil Nadu

4,635

6,302

36%

34

Puducherry

136

129

-6%

35

Andaman and Nicobar Islands

18

19

6%

36

Telangana

2,876

3,610

26%

37

Andhra Pradesh

2,138

2,730

28%

38

Ladakh

7

13

95%

39

Other Territory

97

141

45%

40

Center Jurisdiction

179

161

-10%

 

Grand Total

66,291

87,678

32%

 


[1]Does not include GST on import of goods

***

M.Chopade/S.Shaikh/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1741256) Visitor Counter : 420