सांस्कृतिक मंत्रालय
केंद्रीय सांस्कृतिक राज्यमंत्री मीनाक्षी लेखी यांचे जी-20 देशांच्या सांस्कृतिक मंत्र्यांच्या बैठकीत भाषण
सांस्कृतिक आणि सृजनशील क्षेत्रांना विकासाचे प्रेरक म्हणून विकसित करण्यासाठी भारताने केलेल्या प्रयत्नांची दिली माहिती
Posted On:
31 JUL 2021 9:25PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 31 जुलै 2021
ठळक वैशिष्ट्ये :
- केंद्रीय सांस्कृतिक राज्यमंत्री मीनाक्षी लेखी यांनी जी-20 देशांच्या सांस्कृतिक मंत्र्यांच्या बैठकीत सहभाग घेतला
- भारताने सांस्कृतिक आणि सृजनशील क्षेत्रांचा उपयोग विकासासाठी प्रेरक म्हणून करण्यासाठी काय उपाययोजना केल्या याची माहिती, लेखी यांनी यावेळी दिली.
- सांस्कृतिक परंपरा आणि वारशाच्या संरक्षणाविषयी या बैठकीत चर्चा झाली.
- यावेळी सर्व सांस्कृतिक मंत्र्यांनी जी-20 सांस्कृतिक कार्यकारी गटाच्या संदर्भ अटींचा स्वीकार केला.
जी-20 सांस्कृतिक मंत्र्यांच्या 30 जुलै रोजी झालेल्या या बैठकीत भारताच्या सांस्कृतिक राज्यमंत्री मीनाक्षी लेखी सहभागी झाल्या होत्या. सध्या जी-20 संघटनेचे अध्यक्ष असलेल्या इटलीने या परिषदेचे आयोजन केले होते.
यावेळी सांस्कृतिक परंपरांच्या संरक्षणावर चर्चा झाली. सांस्कृतिक क्षेत्राला जाणवणारे हवामान बदलाचे संकट , प्रशिक्षण आणि शिक्षणाच्या मार्गाने क्षमता बांधणी, सांस्कृतिक क्षेत्रासाठी डिजिटल व्यवहार आणि नवे तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक आणि सृजनशील क्षेत्राचा विकासाचे इंजिन म्हणून उपयोग, या सर्व विषयांवर या परिषदेत चर्चा झाली.
यावेळी, लेखी यांनी, ‘सांस्कृतिक आणि सृजनशील क्षेत्रांचा विकासाला प्रेरणा देण्यासाठी उपयोग’ या विषयावर भारताच्या प्रतिनिधी म्हणून आपले मत व्यक्त केले.
यावेळी, त्यांनी सांस्कृतिक आणि सृजनात्मक क्षेत्रांचा आर्थिक विकास आणि रोजगारासाठी कसा उपयोग झाला आणि महिला,युवक आणि स्थानिक समुदायांना अधिक संधी देण्याची या क्षेत्राची क्षमता देखील त्यांनी अधोरेखित केली. यासाठी, त्यांनी तयार केलेले पर्यावरण स्नेही उत्पादने आणि सेवांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केल्याचे त्यांनी सांगितले.
सांस्कृतिक आणि सृजनशील क्षेत्रांना विकासचे इंजिन, म्हणून विकसित करण्यासाठी शाश्वत पद्धतीने रोजगारनिर्मिती, विषमता कमी करणे, विकासाला चालना देणे तसेच या सर्व लोकाना एक वैशिष्ट्यपूर्ण ओळख निर्माण करुन देणे, यावर त्यांनी भर दिला.
सांस्कृतिक आणि सृजनशील क्षेत्रे, जसे की पर्यटन सर्किट, योग आणि आयुर्वेदाला प्रोत्साहन इत्यादी उपाययोजना केल्याचे लेखी यांनी सांगितले.
आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक सहकार्य आणि आणि सांस्कृतिक तसेच सृजनशील क्षेत्रांना, तसेच समुदायांना पाठिंबा देणे तसेच सांस्कृतिक तसेच सृजनशील क्षेत्रासाठी सुविधा देण्याच्या भारताच्या कटिबद्धतेचा त्यांनी पुनरुच्चार त्यांनी यावेळी केला.
या चर्चेच्या अखेरीस, जी-20 देशाच्या मंत्र्यानी जी-20 देश सांस्कृतिक कार्यकारी गटाच्या सहकार्य गटाच्या संदर्भ अटींचा स्वीकार केला.
संस्कृती मंत्र्यानी यावेळी जी-20 नेत्यांच्या 2021 जी-20 मंत्रिस्तरीय जाहीरनामा स्वीकारला.
* * *
Jaydevi PS/R.Aghor/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1741136)
Visitor Counter : 214