PIB Headquarters

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित बातमीपत्र

Posted On: 28 JUL 2021 8:52PM by PIB Mumbai

नवी दिल्ली/मुंबई 28 जुलै 2021

  • राष्ट्रव्यापी लसीकरण अभियानाअंतर्गत आतापर्यंत लसीच्या 44.61 कोटी मात्रा देण्यात आल्या.
  • देशात आतापर्यंत एकूण 3,06,63,147 कोरोनामुक्त
  • रुग्ण बरे होण्याचा सध्याचा दर 97.39%
  • गेल्या 24 तासात 41,678 जण कोरोनातून बरे झाले
  • गेल्या 24 तासात देशात 43,654 नव्या रुग्णांची नोंद
  • देशात उपचाराधीन रुग्णांची संख्या 3,99,436
  • उपचाराधीन रुग्ण, एकूण रुग्णांच्या 1.27%
  • साप्ताहिक पॉझीटीव्हिटी दर 5% पेक्षा कमी, सध्या हा दर 2.36%
  • दैनंदिन पॉझीटीव्हिटी दर 2.51%, हा दर 5% पेक्षा कमी राहिला आहे
  • चाचण्यांच्या क्षमतेत वाढ, एकूण 46.09 कोटी चाचण्या करण्यात आल्या

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19  घडामोडींवरील माहिती

भारतात कोरोना प्रतिबंधक एकूण लसीकरण 44.61 कोटीपेक्षा जास्त झाले आहे. आज सकाळी 8  वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार एकूण 53,73,439 सत्रांद्वारे  44,61,56,659 मात्रा देण्यात आल्या आहेत.गेल्या 24 तासात 40,02,358 मात्रा देण्यात आल्या.

21 जून 2021 पासून कोविड-19 सार्वत्रिक लसीकरणाचा नवा  टप्पा सुरु झाला आहे. देशभरात कोविड लसीकरणाचा वेग आणि व्याप्ती वाढवण्यासाठी केंद्र सरकार कटीबद्ध आहे.

महामारीच्या सुरवातीपासून कोरोनाची लागण झालेल्यांपैकी एकूण 3,06,63,147 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. गेल्या 24 तासात 41,678 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. कोरोनातून बरे होण्याचा दर 97.39% आहे.

गेल्या 24 तासात 43,654 नव्या दैनंदिन रुग्णांची नोंद झाली.

सलग 31 दिवस 50,000 पेक्षा कमी नव्या दैनंदिन रुग्णांची नोंद होत असून केंद्र आणि राज्य सरकार/केंद्र शासित प्रदेश यांच्या समन्वित प्रयत्नांचा हा परिणाम आहे.

देशात उपचाराधीन रुग्णांची संख्या 3,99,436 असून उपचाराधीन रुग्ण, एकूण पॉझिटीव्ह रुग्णांच्या  1.27% आहेत.

चाचण्या करण्याच्या क्षमतेत वाढ करत देशात गेल्या 24 तासात 17,36,857 चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत 46 कोटीहून अधिक (46,09,00,978) चाचण्या केल्या आहेत.

साप्ताहिक पॉझीटीव्हिटी दर सध्या 2.36% आणि दैनंदिन पॉझीटीव्हिटी दर आज 2.51% आहे. दैनंदिन पॉझीटीव्हिटी दर सलग 51 व्या दिवशी 5% पेक्षा कमी आहे.

 इतर अपडेट्स :

 

M.Chopade/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1740084) Visitor Counter : 163


Read this release in: English , Hindi , Punjabi , Gujarati