आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशांनी भारतीय वैद्यक संशोधन परिषदेशी विचारविनिमयाने आपापल्या राज्यात विशेष सिरो सर्वेक्षण करुन जिल्हा निहाय डेटा तयार करण्याची केंद्र सरकारची सूचना
सर्वेक्षणाचे निष्कर्ष कोविड-19 संबंधित सार्वजनिक आरोग्याची लक्ष्ये निर्धारित करण्यासाठी तसेच सार्वजनिक आरोग्यासंबंधित बाबी पारदर्शक आणि तथ्याधारित ठेवण्यासाठी मार्गदर्शक ठरतील
Posted On:
28 JUL 2021 7:22PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 जुलै 2021
केंद्र सरकारने सर्व राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशांना भारतीय वैद्यक संशोधन परिषदेबरोबर (ICMR) विचारविनिमय करून आपापल्या राज्यात सिरो सर्वेक्षण करण्याचा सल्ला दिला आहे. अशा सर्वेक्षणाचा जिल्हा निहाय डेटा तयार करावा, जेणेकरून सार्वजनिक आरोग्यासंबंधी उपाय योजना निश्चित करण्यासाठी अशा प्रकारची स्थानिक माहिती महत्त्वपूर्ण ठरेल. केंद्रीय आरोग्य सचिवांनी सर्व राज्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव किंवा मुख्य सचिव किंवा आरोग्य सचिव यांना एका पत्राद्वारे ही सूचना केली आहे.
भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने केलेल्या चौथ्या राष्ट्रीय सिरो सर्वेक्षणाच्या निष्कर्षांचा संदर्भ देत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्यांनी अशा प्रकारचा सर्वेक्षण अभ्यास परिषदेबरोबर (ICMR) विचारविनिमय करून स्वतःच्या राज्यात करून घेण्याची सूचना केली आहे. भारतीय वैद्यक संशोधन परिषदेशी विचारविनिमय करून केलेल्या अशा अभ्यासादरम्यान प्रमाणित नियमावली पाळली जाईल तसेच अशा प्रकारच्या अभ्यासातून निघालेले निष्कर्ष संबंधित राज्यांमध्ये किंवा केंद्रशासित प्रदेशांमध्ये कोविड-19 संबंधित सार्वजनिक आरोग्याची लक्ष्ये निर्धारित करण्यासाठी तसेच सार्वजनिक आरोग्यासंबंधित बाबी पारदर्शक आणि तथ्याधारित ठेवण्यासाठी मार्गदर्शक ठरतील.
भारतीय वैद्यक संशोधन परिषदेने नुकताच भारतातील 70 जिल्ह्यांमध्ये अशाप्रकारचे राष्ट्रीय सिरो सर्वेक्षण करून घेतले आहे याकडे निर्देश केला आहे. या सर्वेक्षणातील निष्कर्ष पुढीलप्रमाणे राज्यनिहाय संसर्ग-व्याप्ती दर्शवतात.
भारतीय वैद्यक संशोधन परिषदेचे राष्ट्रीय सिरो सर्वेक्षण हे कोविड संसर्गाची राष्ट्रीय पातळीवरील व्याप्ती मापनाच्या दृष्टीने केले होते. त्यामुळे राष्ट्रीय सिरो सर्वेक्षणाच्या निष्कर्षात जिल्ह्यांतर्गत तसेच वेगवेगळ्या राज्यांमधील संसर्ग व्याप्तीचे वैविध्य पूर्णपणे ठळक दिसणार नाही.
Jaydevi PS/V.Sahjrao/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1740025)
Visitor Counter : 323