आयुष मंत्रालय
कोविड 19 उपचारासाठी,एन आय सी ई ने केलेल्या नियमांबाबतच्या माध्यमातल्या वृत्ताचे खंडन
नेटवर्क ऑफ इन्फल्युएन्झा केअर एक्स्पर्ट नी विकसित केलेल्या नियमांना आयुष मंत्रालयाची मान्यता नाही
Posted On:
28 JUL 2021 6:45PM by PIB Mumbai
मुंबई, 28 जुलै 2021
आयुष मंत्रालया अंतर्गत पुण्याच्या राष्ट्रीय निसर्गोपचार केंद्राने, (एनआयएन) सौम्य ते तीव्र लक्षणे असलेल्या कोविड-19 रुग्णासाठी, डॉ बिस्वरूप रॉय चौधरी यांच्या एन आय सी ई नियमांची शिफारस केल्याचे वृत्त नुकतेच काही माध्यमातून आले आहे. हे वृत्त पूर्णपणे चुकीचे आहे असे स्पष्ट करण्यात येत आहे. एन आय सी ई ने केलेल्या असत्य दाव्याच्या आधारावर आधारित हे वृत्त असावे.
नेटवर्क ऑफ इन्फल्युएन्झा केअर एक्स्पर्ट, एन आय सी ईने विकसित केलेल्या नियमांना आयुष मंत्रालयाची मान्यता नाही असे पुण्याच्या एनआयएन ने स्पष्ट केले आहे.
एनआयएन, एन आय सी ईचे समर्थन करत नाही.
कोविड-19 संदर्भात निसर्गोपचारातल्या उत्तम प्रथांचे एनआयएन दस्तावेजीकरण करत आहे. यासंदर्भात एनआयएनने, अहमदनगर इथल्या एन आय सी ई केंद्राने स्वीकारलेल्या पद्धतीचा पूर्वलक्षी निरीक्षणात्मक अभ्यास केला. ही केवळ शैक्षणिक बाब होती, या पद्धतीचे हे समर्थन नव्हते.
आपल्या तांत्रिक चमूने तयार केलेला अहवाल हा केवळ पूर्वलक्षी निरीक्षणाची पुनरावृत्ती असून एनआय सीई चमू आणि रुग्ण यांच्याशी चर्चा आणि मुलाखतीवर ते आधारित होते. निष्कर्ष हा केवळ शैक्षणिक होता आणि वैज्ञानिक छाननीनंतरच त्याला मान्यता देता येईल
कोविड योग्य वर्तनाची गरज नाही हे एन. आय. सी.ई चे विधान एनआयएनने स्पष्टपणे फेटाळले .
23 जुलै 2021 रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत एन.आय.सी.ई. ने केलेले विधान आणि पीपीई किट्स, मास्क घालण्याची किंवा सामाजिक अंतर पाळण्याची गरज नाही असे सांगणारा समाज माध्यमांवर प्रसारित केला जात असलेला व्हिडिओ देखील एनआयआयने फेटाळून लावला आहे. एनआयएनने कोविड -19 महामारीच्या काळात राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत निर्दिष्ट सर्व मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन व समर्थन केले आहे. एनआयएन सुरक्षित अंतर राखणे, मास्कचा वापर यासारख्या कोविड योग्य सामाजिक वर्तनाचे समर्थन करते आणि कोविड-19 ला प्रतिबंध आणि आळा घालण्यासाठी ते आवश्यक असल्याचे मानतो.
एनआयएनच्या नावाचा अनधिकृत वापर
एन.आय.सी.ई. ने आयुष मंत्रालयाच्या उपचार पद्धतीला मान्यता देणारा म्हणून एनआयएन, किंवा आयुष्य मंत्रालयाची परवानगी घेतली नाही आणि म्हणूनच एनआयसीई ने पत्रकार परिषदेत एनआयएन, आयुष मंत्रालय, भारत सरकार आणि राष्ट्रीय चिन्हाचा अनधिकृत वापर केल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
यासंदर्भातले व्हिडिओ आणि खोटी विधाने मागे घेण्याबाबत एनआयएन एन.आय.सी.ई.शी संपर्क साधत आहे.
MC/NC/SK/PM
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1740006)
Visitor Counter : 526