अणुऊर्जा विभाग

कोविड बीप प्रणालीची मोठ्या प्रमाणात निर्मिती करण्यासाठी केंद्र सरकार पाऊले उचलत आहे- डॉ जितेंद्र सिंह


कोविड बीप ही कोविड रुग्णांच्या तब्बेतीच्या मापदंडावर देखरेख ठेवणारी भारताची पहिली स्वदेशी, किफायतशीर आणि वायररहित प्रणाली

Posted On: 28 JUL 2021 4:26PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 28 जुलै 2021

कोविड बीईईपी म्हणजेच कोविड बीप ची मोठ्या प्रमाणात निर्मिती करण्यासाठी केंद्र सरकार पाऊले उचलत असल्याचे  केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्य मंत्री (स्वतंत्र कार्यभार ) डॉ जितेंद्र सिंह यांनी आज लोकसभेत एका प्रश्नाच्या उत्तरादाखल पटलावर ठेवलेल्या माहितीमध्ये नमूद केले आहे.  कोविड बीप ही कोविड रुग्णांच्या तब्बेतीच्या मापदंडावर देखरेख ठेवणारी  भारताची  पहिली स्वदेशी, किफायतशीर आणि  वायररहित प्रणाली असल्याचे त्यांनी म्हटले आहे. हैदराबादच्या ईएसआयसी वैद्यकीय महाविद्यालयाने,इलेक्ट्रोनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि अणु उर्जा विभागाच्या सहकार्याने कोविड बीप विकसित केले आहे.

आतापर्यंत हैदराबादमधल्या सरकारी रुग्णालयात, 2020-2021या वित्तीय वर्षात लावण्यासाठी आणि प्रतिसादाकरिता  40 कोविड बीप  उपकरणांचा पुरवठा करण्यात आला आहे. याशिवाय 2021च्या ऑगस्ट मध्यापर्यंत पाठवण्यासाठी,आणखी 100 उपकरणे तयार करण्यात येत आहेत.

कामगार आणि श्रम मंत्रालयाच्या सचिवांना, आभासी परिषदेच्या माध्यमातून या उत्पादनाची  वैशिष्ट्ये 11 जून 2021 ला सादर करण्यात आली. चर्चेच्या आधारे, मोठ्या प्रमाणातल्या उत्पादन घेण्यासाठी  कामगार आणि श्रम मंत्रालयाला प्रस्ताव सादर करण्यात आल्याचेही यामध्ये म्हटले आहे. 

 

Jaydevi PS/N.Chitale/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1739915) Visitor Counter : 268