संरक्षण मंत्रालय
फ्लीट पुरस्कार सोहळा- पश्चिम नौदल कमांड
Posted On:
24 JUL 2021 2:32PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 जुलै 2021
पश्चिम नौदलाचा तलवार ताफा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नौदल फ्लीटचा पुरस्कार सोहळा दर वर्षाअखेरीस होता असतो. काल म्हणजेच 23 जुलै 2021 रोजी एका वर्षाच्या विलंबानंतर मुंबईत हा पुरस्कार सोहळा झाला. पश्चिम फ्लीटचे कमांडिंग अधिकारी रियर ऍडमिरल अजय कोचर यांनी हा सोहळा आयोजित केला होता. या फ्लीटच्या एप्रिल 2020 ते मार्च 2021 या कालावधीतील कामगिरी आणि उपलब्धीचा यावेळी गौरव करण्यात आला. पश्चिम नौदल कमांडचे फ्लॅग ऑफिसर व्हाईस ऍडमिरल आर हरी कुमार, फ्लॅग ऑफिसर कामांडीग इन चीफ, हे या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर यंदा हा सोहळा अत्यंत साध्या पद्धतीने करण्यात आला होता. कार्यक्रमाल मर्यादित लोकांची उपस्थिती होती, मात्र हा तलवार ताफा असल्याने, फ्लीटच्या उपलब्धीची संख्या बरीच होती. नौदलाची विविध क्षेत्रातली कामगिरी, सुरक्षितता आणि मनोबलाच्या क्षेत्रात एकूण 20 चषके यावेळी देण्यात आली. सागरी मोहिमांमध्ये दाखवलेल्या अतुल्य साहसाबद्दल, आयएनएस कोलकात्याला सर्वोत्तम युद्धनौकेचा पुरस्कार मिळाला. नौदलाच्या सर्व ताफयांमध्ये सर्वाधिक उत्साही आणि मनोबल वाढवणाऱ्या प्रेरणादायी कामगिरीबद्दल, आयएनएस तर्कश ला ‘सर्वाधिक उत्साही’ युद्धनौकेचा पुरस्कार मिळाला. टँकर आणि ओपीव्हीच्या श्रेणीत उत्तम कामगिरी केल्याबद्दल आयएनएस दीपक ला सर्वोत्तम युद्धनौकेचा पुरस्कार मिळाला.
या वर्षभरात, म्हणजे, एप्रिल 2020 ते मार्च 2021 झालेली नौदल ताफ्याची कार्यवाही अभूतपूर्व होती. नौदलाची जहाजे कायम मिशनवर तैनात होती. तसेच कोविड संकट काळात मदत साहित्य पोचवण्याच्या कामातही या ताफ्याने पूर्ण सहभाग घेतला. पश्चिम ताफ्याच्या युद्धनौका आणि विमाने यांनी तौक्ते वादळाच्या काळात अनेकांची सुटका करण्याची जबाबदारी देखील यशस्वीपणे पार पाडली.
या सर्व अभियानांमध्ये प्राणांचे बलिदान देणाऱ्या जवानांना या सोहळ्यात श्रद्धांजली वाहण्यात आली आणि त्यांच्या कुटुंबियाप्रति शोकसंवेदना व्यक्त करण्यात आल्या. ज्या ज्या वेळी देशाला मदतीची गरज असते, त्या प्रत्येक वेळी, हा तलवार ताफा प्रतिसाद देण्यात आघाडीवर असतो.
S.Tupe /R.Aghor/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1738531)
Visitor Counter : 262