युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
ऑलिंपिक सोहळा प्रदर्शनासाठी नवी दिल्लीत आयोजित कार्यक्रमात केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर, राज्यमंत्री निशिथ प्रामाणिक आणि ऑलिंपिकमधील दिग्गजांकडून भारतीय चमूला स्फूर्तिदायी शुभेच्छा
Posted On:
23 JUL 2021 7:52PM by PIB Mumbai
प्रमुख मुद्दे-
आज लहान शहरांमधील उगवती प्रतिभा हेरून तिचा परिपोष केला जात आहे, कारण त्यांना सर्वोच्च पातळीवर स्पर्धा करता येण्यासाठी सर्वोत्तम सुविधा आणि व्यावसायिक प्रशिक्षण मिळत आहे- अनुराग ठाकूर
भारताला येत्या काळात क्रीडाक्षेत्रातील ऊर्जाकेंद्र म्हणून घडविण्याची पूर्वतयारी गेल्या काही वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात पूर्ण- अनुराग ठाकूर
चार वेळा ऑलिंपिक खेळलेला योगेश्वर दत्त आणि भारताची पहिली महिला पदकविजेती करनाम मल्लेश्वरीही या सोहळ्यात उपस्थित
ऑलिंपिक स्पर्धेचा उदघाटन सोहळा साजरा करण्यासाठी नवी दिल्लीत मेजर ध्यानचंद स्टेडियम येथे आज केंद्रीय युवक व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या भारतीय क्रीडा प्राधिकरणातर्फे एका दिमाखदार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात केंद्रीय युवक व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग सिंह ठाकूर आणि या मंत्रालयाचे राज्यमंत्री निशिथ प्रामाणिक यांच्यासह ऑलिंपिकमधील दिग्गजांनी भारतीय चमूसाठी स्फूर्तिदायी शुभेच्छा व्यक्त केल्या.
रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे आणि दर्शना जर्दोश, चार वेळा ऑलिंपिक खेळून आलेला योगेश्वर दत्त, भारताची पहिली महिला पदकविजेती करनाम मल्लेश्वरी, मुष्टियोद्धा अखिलकुमार, क्रीडा सचिव रवी मित्तल आदी मान्यवरही या कार्यक्रमात उपस्थित होते. भारतीय खेळाडूंचा उत्साह वाढविण्यासाठी आणि त्यांना साथ देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनातून सुरु झालेल्या #Cheer4India मोहिमेचाच एक भाग म्हणून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
We have provided end to end support and full vaccination to our athletes; Prime Minister @narendramodi himself talked to many athletes and encouraged them to bring medal for the country: Union Sports Minister @ianuragthakur #Cheer4Indiia #Olympics #TokyoOlympics pic.twitter.com/lAzEOUPvGQ
— PIB India (@PIB_India) July 23, 2021
"टोकियो ऑलिंपिककडे जाणारा भारताचा मार्ग म्हणजे खेळाडूंसाठी आणि संयोजकांसाठीही अनेक अर्थांनी कसोट्यांचा आणि विजयाचा एकत्रित प्रवास होता. खरेतर, ऑलिंपिक क्रीडास्पर्धांना साजेसा असाच हा प्रवास होता, असेच म्हणावे लागेल" अशी भावना यावेळी अनुराग ठाकूर यांनी व्यक्त केली.
As a Union Minister, you have lot of responsibilities to perform. Especially under the dynamic leadership of PM @narendramodi, you can't just sit back. Good quality infrastructure, quality coaches and exposure ought to be provided: Union Minister @ianuragthakur
#Cheer4Indiia pic.twitter.com/m7xFHEtucG
— PIB India (@PIB_India) July 23, 2021
"आम्ही धोरणे आखताना लांबच्या पल्ल्याचा विचार करून क्रीडापटू, त्यांच्या आवडी आणि त्यांचे हित केंद्रस्थानी ठेवले आहे. गेल्या सात वर्षांत, आम्ही भारतातील क्रीडाविषयक पायाभूत सुविधांचा विस्तार आणि पुनर्निर्माण केले आहे. आज लहान शहरांमधील उगवती प्रतिभा हेरून तिचा परिपोष केला जात आहे, कारण त्यांना सर्वोच्च पातळीवर स्पर्धा करता येण्यासाठी सर्वोत्तम सुविधा आणि व्यावसायिक प्रशिक्षण मिळत आहे" असे प्रतिपादन अनुराग ठाकूर यांनी केले.
ठाकूर पुढे म्हणाले की, 130 कोटी भारतीयांच्या शुभेच्छा क्रीडा क्षेत्रातील भव्य मंचावर उत्कृष्ट कामगिरीचे प्रदर्शन करण्यासाठी 127 ऑलिम्पिक खेळाडूंना प्रेरित करतील. आज आपण टोकियो येथील ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी झालेल्या भारतीय चमूसाठी शुभेच्छा देत आहोत हा अभिमानाचा क्षण आहे.
राज्यमंत्री निशीथ प्रामाणिक म्हणाले की देशाच्या पूर्वेकडील भागाने मेरी कोम आणि हिमा दास यांच्यासारखे उत्कृष्ट खेळाडू दिले असून ओदिशा , बंगाल आणि मणिपूरचेही यात योगदान आहे.
या संभाषणादरम्यान चारवेळा ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेले योगेश्वर दत्त म्हणाले की, खेळाडूंमध्ये पदकांची आस दिसत असून ती भारताला विजयी करेल. ऑलिम्पिकमध्ये मिळवलेल्या विजयाची आठवण करून देत भारताची पहिली महिला पदक विजेती कर्णम मल्लेश्वरी म्हणाली की जेव्हा त्यावेळच्या पंतप्रधानांनी तिला "भारताची सुपुत्री " असे संबोधले तेव्हा तिच्या डोळ्यांत अश्रू आले. माजी भारतीय बॅडमिंटनपटू पुलेला गोपीचंद म्हणाले की, माझ्यासाठी देशातील क्रीडा परिसंस्था आणि खेळांचा विकास महत्वाचा आहे. मी क्रीडा क्षेत्रात मोठे परिवर्तन आणि लोकांचा पाठिंबा पाहिला आहे.
सोनी स्टुडिओशी संवाद साधताना अनुराग ठाकूर म्हणाले की, आम्ही खेलो इंडिया युवा स्पर्धा, खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धा आणि खेलो इंडिया शालेय स्पर्धा सारख्या क्रीडा स्पर्धा आयोजित करून खेळाच्या विकासावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्ही देशात मोठ्या क्रीडा स्पर्धा आयोजित करण्याचा प्रयत्न करू. तसेच चांगल्या दर्जाचे प्रशिक्षक घडवण्यावर आमचा भर असेल. आणि शेवटी खेळाडूंना रोजगाराच्या संधी दिल्यामुळे त्यांना करिअर म्हणून खेळाचा स्वीकार करण्यास प्रोत्साहन मिळेल.
नंतर मान्यवरांनी कार्यक्रमाच्या ठिकाणी ऑलिम्पिक उद्घाटन सोहळ्याचे थेट प्रक्षेपण पाहिले आणि टोकियोच्या नॅशनल स्टेडियमवर प्रवेश करणाऱ्या भारतीय पथकाला जोरदार घोषणाबाजी करत शुभेच्छा दिल्या.
या ऑलिम्पिकमध्ये भारताने 127 खेळाडूंचे आतापर्यंतचे सर्वात मोठे पथक पाठवले आहे ज्यात 56 महिला खेळाडू आहेत.
***
M.Chopade/J.Waishampayan/S.Kane/P.Kor
(Release ID: 1738330)
Visitor Counter : 313