युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर आणि क्रीडा राज्यमंत्री निशिथ प्रामाणिक, उद्या ऑलिम्पिकच्या उद्घाटन सोहळ्याच्या प्रसंगी नॅशनल स्टेडियमवरून भारतीय खेळाडूंचा उत्साह वाढवतील
Posted On:
22 JUL 2021 10:22PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 22 जुलै 2021
आपल्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी सर्व क्षेत्रातील नामवंत व्यक्ती तसेच माजी खेळाडू आणि इतरही बरेच जण देशभरातून या कार्यक्रमात सहभागी होतील.
32व्या समर ऑलंपिकला उद्यापासून जपानमधील टोकियो येथे सुरुवात होत आहे. केंद्रीय युवक कल्याण आणि क्रीडामंत्री अनुराग सिंग ठाकुर व केंद्रीय युवक कल्याण आणि क्रीडा राज्यमंत्री निशिथ प्रामाणिक हे मेजर ध्यानचंद नॅशनल क्रीडांगणावरून ऑलिंपिकचा उद्घाटन सोहळा बघतील.
सर्व क्षेत्रातील नामवंत व्यक्ती तसेच माजी खेळाडू आणि देशभरातील इतरजण या प्रसंगाला उपस्थित राहून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कल्पनेतील #Cheer4India मोहिमेचा भाग म्हणून खेळाडूंना प्रोत्साहन देतील.
हरियाणाचे क्रीडामंत्री संदीप सिंग, मध्यप्रदेशच्या क्रीडामंत्री यशोधरा राजे सिंदिया, राष्ट्रीय बॅडमिंटन कोच पुल्लेला गोपीचंद ही सोहळ्यात भाग घेणाऱ्या अपेक्षित नामवंतांपैकी काही नावे.
भारतातर्फे या ऑलिंपिकला आत्तापर्यंतचे सर्वात जास्त संख्येचे म्हणजे 127 खेळाडूंचा समावेश असलेले पथक जात आहे. यामध्ये महिला ॲथलिटच्या सर्वात मोठ्या म्हणजे 56 खेळाडूंच्या पथकाचा समावेश आहे
M.Chopade/V.Sahjrao/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1737922)