आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड : गैरसमज आणि वस्तुस्थिती


केंद्र सरकारने एकही व्हेंटिलेटर न वापरता ठेवलेला नाही

केंद्र सरकारने राज्य / केंद्रशासित प्रदेशांना वितरणासाठी सज्ज असेलला प्रत्येक संच तातडीने पाठविला आहे

पुरवठा केलेल्या व्हेंटिलेटर्सपैकी, राज्यांमध्ये मोठ्या संख्येने व्हेंटिलेटर्स स्थापित करण्यात आले नाहीत आणि व्हेंटीलेटर्स राज्यांच्या गोदामामध्ये वापराविना सुद्धा आहेत

व्हेंटिलेटर्स त्वरित स्थापित करणे आणि जर व्हेंटिलेटरची अतिरिक्त आवश्यकता भासली तर गरजेनुसार मागणी नोंदविण्याची केंद्राची राज्यांना विनंती

Posted On: 22 JUL 2021 10:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 22 जुलै 2021

अलीकडेच प्रसारित झालेल्या एका प्रसारमाध्यमांच्या वृत्तात  असा आरोप करण्यात आला आहे की, कोविडच्या दुसऱ्या  लाटेच्या संकटा दरम्यान केंद्राने 13,000 व्हेंटिलेटर्स वापराविना तसेच ठेवले. वृत्तात असे म्हटले आहे की, सरकारकडे 13,000  व्हेंटिलेटर्स सूचिबद्ध होते  आणि ते व्हेंटीलेटर्स  राज्यांना वितरीत करण्यात आले नाहीत.

 हे स्पष्ट करण्यात येत आहे कीयासंदर्भात प्रसारमाध्यमातील वृत्त  अपुऱ्या माहितीच्या आधारावर असून तथ्यहीन आहे.  अशी  केंद्र सरकारकडे कोणतीही व्हेंटिलेटर्स पडून नाहीत. वितरणासाठी सज्ज असलेले बहुतांश व्हेंटीलेटर्स त्वरेने  राज्ये / केंद्रशासित प्रदेशांना पाठवले जात आहेत.म्हणूनच, प्रसारमाध्यमांमधील लेखात नोंदवलेली  निरीक्षणे आणि काढण्यात आलेला अन्वयार्थ  वस्तुस्थितीवर आधारित नाही.

आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने महामारीच्या सुरूवातीपासूनच  व्हेंटिलेटर्स  खरेदी करण्यासाठी मागणी नोंदवली होती. 27 मार्च ते 17 एप्रिल 2020 दरम्यान, 58,850 व्हेंटिलेटर्स  खरेदी करण्यासाठी  मागणी नोंदवली होती. व्हेंटिलेटर्सची जागतिक स्तरावर  मागणी वाढली  आणि व्हेंटिलेटर उत्पादक देशांनीही निर्यातीवर  निर्बंध घातले या  पार्श्वभूमीवर  परदेशातून व्हेंटिलेटर्स आयात करण्याची शक्यता  कमी झाल्याचे  लक्षात घेऊन सर्व मेक इन इंडिया व्हेंटिलेटर्स खरेदी करण्यात आले. व्हेंटीलेटर्सच्या  उत्पादनाची   देशांतर्गत  क्षमता खूपच मर्यादित होती त्यामुळे संबंधित  उत्पादकांना उत्पादन वाढविण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले. तंत्रज्ञान हस्तांतरणासाठी तसेच ज्या कंपन्यांना उत्पादन वाढविण्यात मदत करू शकतील अशा कंपन्यांशी करार करण्यात आला.

आवश्यक वैद्यकीय उपकरणांचा पुरेसा पुरवठा होण्यासाठी एम्पॉवर्ड ग्रुप III च्या शिफारशींनुसार केंद्र सरकारकडून खरेदीसाठी आदेश काढले गेले.

जीवरक्षक प्रणालींच्या नमुन्यांची तांत्रिक तपासणी झाल्यानंतर आणि आरोग्य सेवा महासंचालकांच्या अखत्यारीतील तज्ञ समितीने मंजुरी दिल्यानुसार, राज्यें तसेच केंद्रशासित प्रदेशांना या जीवरक्षक प्रणालींच्या पुरवठ्याची शिफारस करण्यात आली. राज्यांकडून तसेच केंद्रशासित प्रदेशांकडून आलेल्या मागणीनुसार हा पुरवठा करण्यात आला. सप्टेंबर 2020 पर्यंत या जीवरक्षक प्रणालींसाठीची मागणी पूर्ण करण्यात आली. त्यानंतर राज्यांकडून आलेली जीवरक्षक प्रणालीची अतिरिक्त मागणी  नगण्य होती. नोव्हेंबर 2020पर्यंत राज्यांकडून आलेली जीवरक्षक प्रणालींची  मागणी यथास्थित पूर्ण करण्यात आली म्हणजे 35,398 जीवरक्षक प्रणाली पाठवण्यात आल्या. नोव्हेंबरपासून  मार्च 2021 पर्यंत जीव रक्षक प्रणालींची राज्यांकडून आलेली मागणी नगण्य होती. म्हणजेच या कालावधीत    अतिरिक्त मागणी जेवढी होती तेवढेच म्हणजे   996 एवढ्याच जीवरक्षक प्रणाली अतिरिक्त मागणी म्हणून पाठवण्यात आल्या.

या उपरौल्लेखित जीवरक्षक प्रणालीच्या पुरवठ्यानंतर  राज्यांमध्ये मोठ्या संख्येने जीवरक्षक प्रणाली गोदामात विनावापर पडून राहिल्या. रुग्णालयांकडून मागणी नसल्यामुळे राज्यांनी या जीवरक्षक प्रणाली रुग्णालयांना उपलब्ध करून दिल्या नाहीत हे लक्षात घेऊन केंद्रीय आरोग्य सचिवांनी 11/4/2021 ला काही राज्यांना एक पत्र लिहिले . या पत्रातून राज्यांतील वाढत्या रुग्ण संख्येमुळे अतिरिक्त जीवरक्षक प्रणालीची आवश्यकता कळवून  उपलब्ध  जीव रक्षक प्रणाली  त्वरित बसवून घ्याव्यात अशी विनंती राज्यांना केली गेली . याशिवाय केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्यांना व केंद्रशासित प्रदेशांना अनेकवार ही आठवण करून दिली.

केंद्र सरकारच्या यादीनुसार 13000 जीवरक्षक प्रणाली पुरवण्यात आल्या नाहीत, हा लेखात काढलेला निष्कर्ष अयोग्य आहे राज्यांकडून मागणी नसल्यामुळे उत्पादकांना पुरवठा करण्याचे वेळापत्रक दिले गेले नाही. उत्पादकांकडे  नोंदवल्या गेलेल्या मागणीनुसार व एकूण मागणीतील जीवरक्षक प्रणालींच्या संख्येनुसार  उत्पादकांना  जीवरक्षक प्रणालीची तांत्रिक जुळवाजुळव करावी लागते. जीवरक्षक प्रणालीच्या प्रत्येक युनिट तांत्रिकरित्या  असेंबल, कॅलिब्रेट करून तसेच  परीक्षण करून व त्याची दर्जा तपासून ते राज्यांना पाठवण्यापूर्वी पुन्हा परीक्षण करून घ्यावे लागते.

 

 M.Chopade/S.Chavan/V.Sahjrao/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1737917) Visitor Counter : 208


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil , Telugu